Saturday, July 27, 2024

Latest Posts

24 DECEMBER: ग्राहक ‘राजा’ आहे असे नुसते बोलून चालणार नाही, CM SHINDE यांचे ग्राहकांना आवाहन

ग्राहक म्हणून आपण सदोदित जागरूक आणि सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणत्याही वस्तू खरेदी करताना आपण खरेदी केलेल्या वस्तूंच्या किंमती (M.R.P.), त्या वस्तूंची मुदत संपण्याची तारीख (Expiry Date), वजन इत्यादी गोष्टी तपासून पाहणे अत्यंत गरजेचे आहे.

वस्तूचा वापर करण्यासाठी हवे तेवढे पैसे देऊन ती वस्तू विकत घेणारी व्यक्ती म्हणजे ‘ग्राहक’ अशी सरळ, साधी आणि सोपी व्याख्या ग्राहकाची केली जाते. भांडवलशाहीमध्ये आर्थिक व्यवस्थेचा एक मुख्य घटक म्हणून ग्राहकाकडे पहिले जाते. आज भारत देशभरात म्हणजेच २४ डिसेंबरला ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ (NATIONAL CONSUMER DAY) साजरा केला जातो. ग्राहक चळवळीच्या माध्यमातून २४  म्हणून साजरा केला जातो. ग्राहकांना त्यांचे अधिकार आणि कर्तव्य यांची बऱ्याचदा माहिती नसते. ग्राहकांच्या अधिकाऱ्यांची त्यांना जाणीव व्हावी आणि संपूर्ण माहिती मिळावी, या अनुषंगाने जागतिक तसेच राष्ट्रीय पातळीवर ग्राहक दिन साजरा केला जातो. याच निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्राहकांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक वस्तू विकत घेतांना कोणती काळजी घ्यावी, तसेच ऑनलाईन शॉपिंगच्या विश्वात ग्राहकांनी कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे, याबद्दल थोडक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांनी माहिती दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? 

नागरिक बंधू – भगिनींनो,

२४ डिसेंबर हा आजचा दिवस आपण ‘ राष्ट्रीय ग्राहक दिन ‘ म्हणून संपूर्ण देशभर साजरा करीत असतो. या दिनाचे औचित्य साधून काही महत्वाच्या बाबी अधोरेखित होणे गरजेचे आहे. ग्राहक म्हणून आपण सदोदित जागरूक आणि सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणत्याही वस्तू खरेदी करताना आपण खरेदी केलेल्या वस्तूंच्या किंमती (M.R.P.), त्या वस्तूंची मुदत संपण्याची तारीख (Expiry Date), वजन इत्यादी गोष्टी तपासून पाहणे अत्यंत गरजेचे आहे.

खरेदी केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये काही दोष असल्यास आपल्या मुला-बाळांना त्याची बाधा होऊ शकते, म्हणूनच खरेदी केलेल्या वस्तूंची पावती ( RECIEPT ) घेण्याची सवय आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे. ग्राहक ‘राजा’ आहे असे नुसते बोलून चालणार नाही, तर तेवढीच जागरूकता आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये दाखवली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने ग्राहक हा राजा होईल. आज राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आपण सगळे निर्धार करूया की, आपण नुसतेच ग्राहक न होता सुजाण आणि जागरूक ग्राहक बनूया. जागो ग्राहक जागो…

तर अशाप्रकारे, मिळालेल्या हक्कानुसार ग्राहकांनी जर आपलं योग्य ते मत मांडलं आणि हवं ते उत्पादन निवडून फसवणूक तक्रार केली तर यामुळे ग्राहकांची फसगत होणे कुठेतरी थांबू शकेल किंवा ते आटोक्यात येऊ शकेल.

हे ही वाचा:

24 DECEMBER: राष्ट्रीय ग्राहक दिन, काय आहेत ग्राहकांचे अधिकार?

Christmas 2023: ख्रिसमसच्या निमित्ताने लहान मुलांना द्या ‘या’ भेटवस्तू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss