Saturday, July 27, 2024

Latest Posts

समृद्धी महामार्गावर नीलगाय आल्याने बसने दिली ट्रकला धडक

समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून या महामार्गावर रोज अपघात घडत आहेत.

समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून या महामार्गावर रोज अपघात घडत आहेत. या रस्ते अपघातामध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. सातत्याने होणाऱ्या या अपघातांमध्ये अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. असाच एक अपघात समृद्धी महार्गावरील वाशिमच्या (Washim) कारंजाजवळ लोकेशन क्रमांक १७३ वर घडला आहे. नागपूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या एका बसने ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये १६ ते १७ प्रवासी प्रवासी जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात १ फेब्रुवारीला रात्री १ ते २ वाजताच्या आसपास घडला. समृद्धी महामार्गावर अचानक नीलगाय आल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. या महार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

समृद्धी महामार्गावर पुजा ट्रॅव्हल नावाची एक खाजगी बस १ फेब्रुवारीला रात्री नागपूरवरून पुण्याच्या दिशेने येत होते. त्यावेळी रात्री १ च्या आसपास बस समृद्धी महार्गावरील वाशिमच्या कारंजा जवळ लोकेशन क्रमांक १७३ जवळ आली. त्यानंतर बसच्या समोर एका ट्रकच्या बाजूला अचानक नीलगाय आली. समोर आलेल्या नीलगायला वाचवण्यासाठी जोरदार ब्रेक मारून ट्रक रोखण्याचा प्रयत्न करून ट्रक नियंत्रणात आणला. यामध्ये नीलगायींचं जीव वाचला पण अचानक ट्रकने ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या बसला अंदाज न लागल्याने ट्रकने बसला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे या बसमध्ये असलेले १६ ते १७ प्रवासी जखमी झाले. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना अमरावती, वर्धा अकोला उपचारासाठी दाखल करण्यात आले.

नवीन बनवण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर सर्वाधिक अपघात हे मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास होतात. या महामार्गावर जवळपास १००० पेक्षा जास्त अपघात घडले आहेत. महार्गावर घडलेल्या अपघातामध्ये आत्तापर्यंत ३६८ जणांनी आपला जीव गमावला आहे. चालकला झोप येणे किंवा डुलकी लागणे यामुळे १८३ अपघात घडले आहेत. तसेच टायर फुटल्याने ५१ अपघात घडले आहेत. तर तांत्रिक कारणांमुळे २०० अपघात झाले आहेत यामध्ये ४१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

हे ही वाचा:

UNION BUDGET 2024: महाराष्ट्रासाठी काय मिळालं हा प्रश्न कायम – Rohit Pawar

छगन भुजबळ यांचा हल्लबोल, ज्या शिवसेनेत तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss