Saturday, March 2, 2024

Latest Posts

तुळजाभवानी मंदिर प्रशासनचा मोठा निर्णय, पहाटे १ वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले

सुट्टांच्या काळात दरवर्षी तुळजाभवानी (Tuljabhavani Temple)मातेच्या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.

सुट्टांच्या काळात दरवर्षी तुळजाभवानी (Tuljabhavani Temple)मातेच्या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अनेकजण नाताळाच्या (Christmas Festival) सुट्टीमध्ये बाहेर फिरण्याचे नियोजन दोन ते तीन महिने आधीच प्लॅन करून ठेवतात. त्यात सुट्टीच्या काळात मंदिरांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. या सर्व सुट्टीचा काळ लक्षात घेऊन तुळजाभवानी मातेच्या मंदिर प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या २५ ते ३१ डिसेंबर काळात तुळजाभवानी मंदिर पहाटे १ वाजल्यापासून चालू राहणार आहे. पहाटेपासूनच मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे.

दरवर्षी सुट्टीच्या काळात राज्यातील सर्व मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. अशीच गर्दी आता तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. या काळात मंदिर प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन त्यांना कमीत कमी वेळेत योग्य दर्शन घडवण्यासाठी मंदिर प्रशासन प्रयत्न करत आहे. नाताळच्या सुट्टीमध्ये तुळजाभवानी मूर्तीचे सुलभ मुख दर्शन घडवण्यासाठी अनेक लोक मोठ्या मोठ्या रांगा लावतात. त्यांना कमी वेळेत दर्शन घडवून देण्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. २५ डिसेंबरपासून तुळजाभवानी मातेचे मंदिर पहाटे १ वाजल्यापासून खुले करण्यात येणार आहे. दरवर्षी नाताळच्या सुट्टीमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.

मागील काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मातेचे मंदिर बहुचर्चित प्राचीन व मौल्यवान अलंकार चोरीला गेले होते. त्यानंतर हा मुद्दा विधिमंडळामध्ये उपस्थित करण्यात आला होता. नंतर पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. विशेष बाब म्हणजे, सात पैकी ५ आरोपी हे मयत झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून मयत झालेल्या लोकांवर गुन्हे दाखल करून काय साध्या होणार आहे? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

24 DECEMBER: राष्ट्रीय ग्राहक दिन, काय आहेत ग्राहकांचे अधिकार?

MUMBAI: DOUBLE DECKER BUS मध्ये आता कॅफिटेरियाची सोय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss