Saturday, July 27, 2024

Latest Posts

राज्यात थंडी वाढली, वाढत्या थंडीचा रब्बी पिकांना फायदा

राज्यभरात सगळीकडे काही प्रमाणात थंडी वाढली आहे.

राज्यभरात सगळीकडे काही प्रमाणात थंडी वाढली आहे. विदर्भात थंडीची लाट आली आहे. तसेच मागील काही आठड्यांपासून दक्षिण भारतामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. पर्वतीय भागात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतामध्ये थंडी वाढली आहे. थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये १२ अंशच्या खाली गेले आहे. नाताळानंतर काही दिवस तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तापमानात घट होण्याची शक्याता आहे.

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात कुठेच थंडी जाणवत नव्हती. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता होती. पण गेल्या आठवड्यापासून तापमानात घट होऊन राज्यात सगळीकडे थंडी वाढली आहे. मागील तीन दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली आहे. काही भागात तापमान १५ अंशपेक्षा खाली आले आहे. वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. मात्र थंडी वाढल्यामुळे नागरिकांना शेकोटी पेटवावी लागत आहे. परभणी जिल्ह्यात ४ दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे सगळीकडे गारठा निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी परभणीतील तापमान १० अंश घसरले आहे. त्यामुळे सगळीकडे गारठा पडला आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेकोटी पेटवली जात आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी ऊबदार कपड्याचा वापर करत आशेत. या थंडीचा विशेष फायदा रब्बी पिकांना होणार आहे.

वातावरणात झालेल्या बदलामुळे नाशिक जिल्ह्यात थंडी वाढली आहे. थंडीपासून बचावण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. तसेच नाशिकच्या ग्रामीण भागात थंडी वाढली असून नागरिक ऊबदार कपडे आणि शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करत आहे. तर काही वृद्ध नागरिक थंडी असल्यामुळे बाहेर पडणे देखील टाळत आहेत. थंडीचे वातावरण असल्यामुळे शेती पिकांना त्याचा फायदा झाला आहे. कांदा, गहू, हरभरा या पिकांना मोठ्या प्रमाणावर थंडीचा फायदा होत आहे.

हे ही वाचा:

शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यांनी केला मोठा दावा, निवडणुका धनुष्यबाणावर…

बुलढाण्यातील शेतकऱ्याच्या घरात सापडला ४० किलो गांजा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss