Saturday, March 2, 2024

Latest Posts

शनिशिंगणापूरचे कर्मचारी सोमवारपासून विविध मागण्यांसाठी संपावर जाणार

शनिशिंगणापूर ट्रस्टचे कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी संपावर जाणार आहेत.

शनिशिंगणापूर ट्रस्टचे कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी संपावर जाणार आहेत. ट्रस्टची चौथी बैठकही असफल ठरली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदनिश्चिती करावी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यांच्यासह १० विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यातील काही किरकोळ मागण्या देवस्थानाकडून पूर्ण करण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. मात्र दोन प्रमुख मागण्या पूर्ण होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी संप करण्याचा निर्णय घेतला आहे.

शनिशिंगणापूर ट्रस्टमधील जवळपास चारशे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या १० विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संदर्भांत देवस्थानाकडून ट्रस्टीसोबत कर्मचाऱ्यांमध्ये बैठक घेण्यात आली. मात्र या चारही बैठका असफल ठरल्या. त्यामुळे येणाऱ्या काळात भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. शनिशिंगणापूर देवस्थानचे सर्व कर्मचारी येत्या समोवारपासून संपावर जाणार आहेत. देवस्थानच्या कामगार युनियनच्या वतीने देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये २५ मागण्या करण्यात आल्या आहेत त्यातील १० मागण्यांवर कर्मचारी ठाम आहेत.

कोणत्या आहेत कर्मचाऱ्यांच्या १० प्रमुख मागण्या

१) सर्व कामगारांच्या अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार हुद्दा आणि पदनिश्चिती करा.
२) दि. १ . १०. २००३ च्या करारानुसार पाचव्या वेतन श्रेणी प्रमाणे २००३ ते २०२३ पर्यंतचा फरक अदा करून मागील फरकासह सर्व कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करा.
३) कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत समाविष्ट करून घ्या.
४) सर्व कामगारांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सेवा मोफत करा.
५) कोरोना महामारीत मरण पावलेल्या कामगारांच्याच्या वारसांना नुकसान भरपाई द्या.
६) मयत कामगारांच्या घरातल्या एका व्यक्तीला देवस्थानच्या सेवेत समाविष्ट करून घ्या.
७) प्रॉव्हिडंट फंड कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा.
८) देवस्थानच्या कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन घडल्यास किंवा तसं आढळून आल्यास सदर कर्मचाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी सदर कर्मचाऱ्यांची चौकशी समितीमार्फत चौकशी करावी.
९)त्या चौकशी समितीमध्ये कामगार युनियनचे दोन संचालक प्रतिनिधी घ्या.
१०) कामगारांच्या सेवानिवृत्तीचा कालावधी ५८ वरून ६० वर्षे करा.

हे ही वाचा:

चिपी विमानतळावरून महत्वाच्या शहरात विमानसेवा सुरु होणार

हिवाळ्यात मका खाणं ठरतं आरोग्यासाठी फायदेशीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss