Saturday, March 2, 2024

Latest Posts

इंदापूरमध्ये शाळेच्या सहलीच्या बसचा भीषण अपघात

इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीच्या बसचा भीषण अपघात झाला आहे.

इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीच्या बसचा भीषण अपघात घडला आहे. सहलीच्या बसची टेम्पोला धडक लागून हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये एका शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला . बसचा अपघात झाला तेव्हा बसमध्ये शिक्षक आणि मुले होती. अवघड वळणावर टेम्पोला बसची धडक बसून ही दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून एक शिक्षक जखमी झाला आहे. या अपघातामध्ये लहान विद्यार्थीही जखमी झाले आहे. सर्व जखमी विद्यार्थ्यांवर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आज सकाळी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे हा भीषण अपघात घडला आहे. शैक्षणिक सहलीची बस आणि टेम्पोचा अपघात घडला आहे . शालेय विद्यार्थ्यांची सहल कोकण दर्शनासाठी गेली होती. अपघात झालेल्या टेम्पोचे नाव आयशर आहे. या टेम्पोमधून बांबूची वाहतूक करण्यात येत होती. हा टेम्पो पंक्चर झाल्याने एका अवघड वळणावर थांबवण्यात आला होता. याच अवघड वळणावर टेम्पोला सहलीच्या बसची धडक लागली आणि अपघात घडला. या अपघाताचा पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

हे ही वाचा:

POLITICS: मुंबईत आम्ही ४०० किमीचे रस्ते बनवू हे मजाक आहे का?, JITENDRA AWHAD यांचा सवाल

मनोज जरांगेंची बीडमध्ये इशारा सभा, सभेसाठी वाहतुकीच्या मार्गात बदल

 Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss