Friday, March 1, 2024

Latest Posts

मनोज जरांगेंची बीडमध्ये इशारा सभा, सभेसाठी वाहतुकीच्या मार्गात बदल

मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून देण्याची मागणी करत, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून देण्याची मागणी करत, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. पण ही मुदत संपण्याच्या आधी २३ डिसेंबरला बीडमध्ये मनोज जरांगे यांची निर्णायक इशारा सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेनंतर २४ डिसेंबर नंतरच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे बीडमधील सकल मराठा बांधवांच्या वतीने या सभेची जोरात तयारी चालू आहे. ही सभा तब्ब्ल १०० एकर जागेवर आयोजित करण्यात येणार आहे.

बीड शहरातील बायपास रोडवर या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. सभास्थळाची पाहणी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केली आहे. जरांगे यांच्या सभेच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाल्यानंतर सभेच्या दिवशी धुळे-सोलापूर महामार्गावरील (Dhule-Solapur Highway) वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय झाला आहे. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मोठी जाळपोळ करण्यात आली होती. तसेच मनोज जरांगे यांची सभा शांततेमध्ये पार पडावी यासाठी पोलिसांनी ४०० जणांवर आतापर्यंत करावी केली आहे. सभेच्या दिवशी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत धुळे-सोलापूर या महामार्गावर मोठे बदल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. छत्रपती संभाजीनगरहून बीड, धाराशिवला जाणारी वाहने पैठण-खरवंडी-शिरूर-पाटोदा-मांजरसुंबा-धाराशिव या मार्गे किंवा संभाजीनगर-गढी-माजलगाव-तेलगाव-धारूर-केज मांजरसुंबामार्गे धाराशिवच्या दिशेने वळवण्यात आली आहेत. तर, धाराशिवून जालन्याला जाण्यासाठी धाराशिव-मांजरसुंबा-केज-धारूर-तेलगाव-माजलगाव-जालना या मार्गे किंवा धाराशिव-मांजरसुंबा-केज-तेलगाव-माजलगाव-गढी-गेवराई या मार्गाचा वापर करून प्रवास करणाऱ्या वाहनांना जालन्याकडे जाता येईल.

धाराशिवहुन छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी धाराशिव-मांजरसुंबा-पाटोदा-शिरूर-खरवंडी-पैठण-छत्रपती संभाजीनगर किंवा मांजरसुंबा-पाटोदा-शिरूर-पाथर्डी पैठण या मार्गाचा वापर करावा लागणार आहे. तर, जालन्याहून नगरला जाण्यासाठी गेवराई-पाडळसिंगी उड्डाणपुलाखालून मादळमोही-खरवंडी-नगर असे जाता येईल. तर, परळीहून बीडमध्ये येताना परळी-तेलगाव-माजलगाव-गढी या रस्त्याचा वापर प्रवाशांना करावा लागणार आहे. बीडमध्ये २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सभेसाठी येणार मराठा बांधवांच्या जेवणाची सोय करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

MAHARASHTRA: कायद्यात बदल, डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास DOCTOR दोषी नाही

मिमिक्री ही एक कला…, कल्याण बॅनर्जी यांचे राज्यसभेचे सभापती धनखर प्रकरणावर स्पष्टीकरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss