अखेर प्रतीक्षा संपली!, HSC चा निकाल उद्या दुपारी २ वाजता जाहीर होणार

सध्या संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष जसे राज्यातील राजकारणाकडे लागले आहे तसेच राज्यातील दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विध्यार्थ्यांच्या निकालाकडे देखील लागले आहे.

अखेर प्रतीक्षा संपली!, HSC चा निकाल उद्या दुपारी २ वाजता जाहीर होणार

सध्या संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष जसे राज्यातील राजकारणाकडे लागले आहे तसेच राज्यातील दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विध्यार्थ्यांच्या निकालाकडे देखील लागले आहे. सीबीएससी (CBSC) आणि आयसीएससी (ICSC) बोर्डाचा बारावीचा निकाल नुकताच लागला. तसेच इतर राज्यातील देखील मोठ्या राज्याचे निकाल देखील लागले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे.

उद्या दिनांक २५ मे रोजी दुपारी २ वाजता बारावीचा निकाल हा जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे. तसेच उद्या दुपारी २ वाजल्यानंतर हा निकाल सर्वांना बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. यंदाच्या वर्षी १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. सायन्स, कॉमर्स, आर्ट तिन्ही विभागांचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्टच्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in पाहता येईल.

केव्हा होणार निकाल जाहीर?

महाराष्ट्र स्टेट बोर्ड 25 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. २५ मे रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल लागणार आहे.

या वेबसाईटवर पाहता येणार निकाल –

http://Maharesult.nic.in

hsc.maharesult.org.in

http://hscresult.mkcl.org

SMS द्वारेही निकाल पाहता येणार –

SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जावून आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.

हे ही वाचा:

‘Anupamaa’ फेम Nitesh Pandey यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, एकाच इंडस्ट्रीला तिसरा धक्का

Brothers Day निम्मित पोस्ट चर्चेत; उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पाहून Raj Thackeray भावुक, छान दिवस होते…

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version