Saturday, July 27, 2024

Latest Posts

आंतरवाली सराटीत आज Manoj Jarange यांची महत्त्वाची बैठक

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. मराठा आरक्षण या मुद्यावरून वातावरण हे चांगलंच तापल्याच दिसून येत आहे.

Manoj Jarange Meeting At Jalana : सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. मराठा आरक्षण या मुद्यावरून वातावरण हे चांगलंच तापल्याच दिसून येत आहे. मराठा आरक्षणाची डेडलाईन जवळ आली आहे. त्यामुळे सरकारकडून जोरदार हालचाली सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन करू नये म्हणून राज्य सरकारने आतापासूनच खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. अश्यातच आता मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढाईची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज रविवार, दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी महत्वाची बैठक आंतरवाली सराटीमध्ये बोलावली आहे. आजच्या बैठकीत सरकारला दिलेल्या अल्टीमेटमसंदर्भात पुढील दिशा ठरणार आहे.

मराठा आंदोलक मनोज जरंगे (Manoj Jarange) यांनी सरकारला दिलेल्या २४ डिंसेबरच्या अल्टीमेटमनंतर आरक्षणासंदर्भात आपली भूमिका आणि पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी मनोज जरांगे यांनी आज बैठक बोलावली आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीतच ही बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारकडून आरक्षणासंदर्भात काय झालं आणि पुढील आंदोलनाची दिशा काय असणार यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता या निर्णायक बैठकीला सुरुवात होईल.

’२४ तारखेला आंदोलन करु नका’, महाजनांचं आवाहन

“शासनाचं काम अतिशय वेगाने चाललं आहे. ते अवगत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. त्यांची उद्या १७ तारखेला बैठक आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यांनी २४ तारीख दिली होती. जरांगे पाटील यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. शासन अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे. हा सगळा विषय अंतिम टप्प्यात आलाय. आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. आम्हाला शंभर टक्के टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आरक्षण देण्याची शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आरक्षण दिलेलं होतं”, असं गिरीश महाजन म्हणाले. “आमची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे. आमची तीन महिन्यात सर्व काम सुरु आहे. मी सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो जे आपल्या हक्काचं आहे ते निश्चित मिळणार आहे. नोंदी इतक्या मिळाल्या आहेत ते या आंदोलनाचं मोठं यश मानावं लागेल. आरक्षण आता अंतिम टप्प्यात आहे. गेल्यावेळी आमदारांच्या घरी हल्ले झाले. त्यामुळे आंदोलकांचं नाव बदनाम होतं. आंदोलन भरकटू नये यासाठी आम्ही विनंती केली की, सरकारचं काम आपण पाहत आहात. त्यामुळे २४ तारखेला आंदोलन करु नका. कारण समाजकंटक याचा फायदा घेतात”, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss