Friday, April 19, 2024

Latest Posts

आंतरवली सराटीमधील उपोषण जरांगेंनी घेतले मागे, पुन्हा एकदा राज्यभरात दौरा करणार

मागील दोन दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळला आहे.

मागील दोन दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळला आहे. त्यातच आता मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटी मध्ये सुरु असलेले आंदोलन स्थगित केले आहे. गेल्या १६ दिवसांपासून मनोज जरांगे आंतरवली सराटीमध्ये उपोषण केले होते. मात्र आज अंबड तालुक्यात जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले. तर मराठवाड्याच्या काही भागांमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. तसेच राजकीय नेत्यांकडून मनोज जरांगे यांच्याबद्दल द्वेष केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलनाची नव्याने प्रक्रिया सुरु केली आहे.

मनोज जरांगे यांनी आज आंतरवली सराटीमधील आमरण उपोषण स्थगित केले आहे. आता जरांगे डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढे काय करायचे हा निर्णय घेणार आहेत. पुढील दोन ते तीन दिवस मनोज जरांगे उपचार घेणार आहेत. त्यानंतर पुढचा दौरा घोषित करेन. काही भागात संचारबंदी लागू केल्याने मराठा बांधवाना इथे येणे शक्य नाही. संचारबंदी लागू असेपर्यंत मराठा बांधवानी शांतपणे आंदोलन करावे. मी सुखरूप आहे. मला कोणीही कुठे नेलेले नाही. बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्या अफवा तुम्ही पसरवून देऊ नका, असे मनोज जरांगे म्हणाले. मराठा बांधवानी केलेल्या विनंतीनंतर मी आमरण उपोषण स्थगित करत आहे. त्याचे रूपांतर आता साखळी उपोषणामध्ये होणार आहे. मी गावागावात जाऊन मराठा बांधवांच्या भेटी घेणार आहे. लोकशाहीने प्रत्येकाला इतरांना भेटण्याचा मूलभूत हक्क दिला आहे. मी तुमच्याकडे येत आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे यांनी एकेरी भाषेत टीका केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. जरांगेंची जीभ घसरल्याने हा नवा वाद सुरु झाला आहे. भाजपच्या काही नेत्यांनी मनोज जरांगे यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मनोज जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाणार आहेत. ते काल मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र, पोलिसांनी लगेच संचारबंदी लागू केल्याने जरांगेंनी मुंबईला जाण्याचा निर्णय रद्द केला. त्यानंतर ते पुन्हा आंतरवली सराटीमध्ये गेले.

हे ही वाचा:

ULHASNAGAR FIRING: जे झालं ते चुकीचंच…MAHESH GAIKWAD यांच्या पत्नी म्हणाल्या

भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय, मनोज जरांगेंवर दाखल होणार गुन्हा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss