जाणून घ्या मुंबई ते गोवा Vande Bharat ट्रेनचे वेळापत्रक

लवकरच मुंबई ते गोवा (Mumbai to Goa) अशी कोकण मार्गावरील वंदेभारताची उद्घाटनाची पहिली फेरी ३ जून रोजी सुरु होणार आहे. ही फेरी मडगांव जंक्शनपासून सुरु होणार आहे.

जाणून घ्या मुंबई ते गोवा Vande Bharat ट्रेनचे वेळापत्रक

लवकरच मुंबई ते गोवा (Mumbai to Goa) अशी कोकण मार्गावरील वंदेभारताची उद्घाटनाची पहिली फेरी ३ जून रोजी सुरु होणार आहे. ही फेरी मडगांव जंक्शनपासून सुरु होणार आहे. ही वंदे भारत ट्रेन नियमित वेळापत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहुन सकाळी ५.२५ वाजता सुटणार आहे. या वंदे भारत ट्रेन ला ८ डब्बे असणार आहेत आणि ही ट्रेन १० स्थानके थांबणार आहेत. प्रवाशांसाठी या ट्रेनच्या नियमित फेऱ्या ४ जूनपासून सुरु होणार आहेत. मुंबई ते गोवा हे ५८६ किमीचे अंतर ही ट्रेन आठ तासांमध्ये कापणार आहे. या मार्गावरील तेजस एक्सप्रेसला ८ तास ५० मिनिटे घेत असल्याने वेगवान वंदेभारतने तासांची बचत होणार आहे. कोकण मार्गावर सोळा सब्याच्या ऐवजी आठ सब्याची वंदेभारत चालवण्यात येणार आहे.

सध्या या मर्गावर जलद गतीची ट्रेन तेजस एक्सप्रेस मुंबई ते मडगाव प्रवासाला ८ तास ५० मिनिटे घेत आहे. त्याच मार्गावरून सेमी हायस्पीड वंदेभारत हेच अंतर ७ तास ५० मिनिटे घेणार आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एक तास वाचणार आहे. वंदेभारत ही विना इंजिनाची विजेवर धावणारी मेट्रोच्या धर्तीची ट्रेन असल्याने कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास वेगवान होणार आहे.

मुंबई ते गोवा असे आहे वंदेभारतचे वेळापत्रक
सीएसएमटीहून सकाळी ५.२५ वा, दादर सकाळी ५.३२ वा, ठाणे ५.५२ वा, पनवेल सकाळी ६.३० वा, रोहा सकाळी ७.३० वा, खेड सकाळी ८.२४ वा, रत्नागिरी सकाळी ९.४५ वा, कणकवली सकाळी ११.२० वा, थिविम दुपारी १२.२८ वा, मडगांव दुपारी १.१५ वा.

मडगांवहून परतीच्या प्रवासाची गाडी
मडगांव दुपारी २.३५ वा, थिवीम दुपारी ३.२० वा, कणकवली दुपारी ४.१८ वा, रत्नागिरी सायंकाळी ५.४५ वा, खेड रात्री ७.०८ वा, रोहा रात्री ८.२० वा, पनवेल रात्री ९ वा, ठाणे रात्री ९.३५ वा, दादर रात्री १०.०५ वा, सीएसएमटी रात्री १०.२५ वा.

वंदेभारत शुक्रवार वगळता आठवड्याचे सहा दिवस धावणार आहे.

हे ही वाचा:

Modi सरकारचे झाले कौतुक! भारताचा केला कायापालट, Morgan Stanley चा अहवाल जाहीर…

महिला कुस्तीपटूंचे प्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळत आहे, Anurag Thakur

The Kerala Story चित्रपटादरम्यान झालेल्या दुखापतीचे फोटो अभिनेत्रीने केले शेअर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version