Saturday, July 27, 2024

Latest Posts

प्रकाश सोळुंकेंच्या घरावर हल्ला करणाऱ्या १७ आरोपींचा जमीन मंजूर

मराठा आरक्षणाच्या मागणीकरून माजलगावमध्ये (Majalgaon) जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या १७ आरोपींना माजलगावचे अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीकरून माजलगावमध्ये (Majalgaon) जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या १७ आरोपींना माजलगावचे अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ३० ऑक्टोबर रोजी माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांच्या घरांवर दगडफेक करून जाळपोळ करण्यात आला होता. त्याचबरोबर नगरपरिषद कार्यालय देखील पेटवून देण्यात आले होते. यामध्ये १७ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्या आरोपींचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर जाळपोळ आणि दगडफेकीच्या संशयावरून २० लोकांच्या विरोधात बीडच्या माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेऊन अटक करायला सुरुवात केली आहे. यामध्ये एकूण १७ जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व संशयित आरोपी एक महिन्यापासून जिल्हा कारागृहामध्ये होते. पण अखेर या १७ संशयित आरोपींना माजलगावच्या सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनात देखील उमटले आहेत. या प्रकरणात लक्षवेधी झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याची तत्काळ दखल घेत बीड पोलीस प्रशासन कामाला लगले असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदार, अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवत, आंदोलनातील गुन्ह्यात जे आरोपी आहेत ते शोधून त्यांना अटक करा असे आदेश दिले आहेत. प्रत्येक गुन्ह्यांचा लवकरात लवकर निपटारा करा, अशा सूचना सुद्धा पोलिस अधीक्षक ठाकूर यांनी जिल्हाभरातील पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला केल्यानंतर या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोळुंके यांनी जाहीर केले आहे. याचवेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. अवैध धंदे आणि राजकीय विरोधकांनी कट रचून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रकाश सोळंके आरोप केला आहे. यामध्ये काही शिक्षक आणि ग्रामपंचायतचे सदस्य देखील असल्याचा दावा सोळंके यांनी केला आहे.

Latest Posts

Don't Miss