Tuesday, May 21, 2024

Latest Posts

Maharashtra Board HSC Result 2023, यंदाही राज्यात मुलींचीच बाजी, महाराष्ट्रात बारावीचा निकाल ९१.२५ टक्के

शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद ही घेतली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना बारावी परीक्षांच्या निकालाबाबत माहिती दिली.

अखेर आज महाराष्ट्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा ही संपणार आहे. आज दिनांक २५ मे रोजी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीचा निकाल हा जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल आज दुपारी २ वाजता जाहीर होणार असून सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हा निकाल पाहता येईल. या संदर्भातच नुकतीच शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद ही घेतली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना बारावी परीक्षांच्या निकालाबाबत माहिती दिली.

हे ही वाचा :  HSC चा निकाल पाहायचा? घ्या या स्टेप्स जाणून

आज पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी अनेक गोष्टीचे खुलासे केले आहेत. यावेळी बोलत असताना त्यांनी सांगितले की,

  • यंदा बारावी बोर्डाचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे.
  • यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेत १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. हा निकाल मागील वर्षापेक्षा कमी आहे.
  • तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी ९३.७३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ८९.१४ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत.
  • या वर्षी देखील कोकण विभागानेच बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के लागला आहे.
  • तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल ८८.१३ टक्के लागला आहे.
  • तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ही ९३. ४३ टक्के लागला आहे
  • खाजगी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ही ८२.३९ टक्के
  • पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या (रिपीटर) निकालाची टक्केवारी ही ४४.३३ टक्के

बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दुपारी जाहीर करणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. राज्यात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली.

हे ही वाचा : 

सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर, प्रवेश फेरीचे वेळापत्रक होणार लवकरच जाहीर

१२ वी नंतर करा हा कोर्स; प्रवेश प्रक्रियेपासून करिअरच्या संधी पर्यंत मिळवा संपूर्ण महिती

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss