Saturday, March 2, 2024

Latest Posts

Maharashtra: देशभरासह राज्यात भरली हुडहुडी, २५ डिसेंबरनंतर थंडी वाढण्याची शक्यता

१९ डिसेंबर रोजी मुंबईतील सांताक्रुज हवामान केंद्रात किमान तापमान २३.७° वर पोहोचले जे सामान्य तापमानापेक्षा सहा अंशांनी जास्त आहे.

सध्या देशभरातील थंडीचं तापमान वाढल्याचे दिसून येत आहे, हवामानात सातत्याने बदल होताना सुद्धा दिसून येत आहे. राज्यातील अनेक भागात सध्या थंडी वाढलेली आहे. महाराष्ट्रात आठवडाभर कोरडं वातावरण राहणार असून सोमवारपासून राज्यात थंडीचा कडाका वाढल्याचे दिसत आहे. मुंबई (MUMBAI), ठाणे (THANE) आणि पुण्यासह (PUNE) राज्यात लोकांनी गरम कपडे घालून घराबाहेर पडायला सुरुवात केली आहे. तसेच, नाताळच्या निमित्ताने मात्र राज्यातील तापमान किंचित वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधील किमान तापमान १२ अंशाखाली गेल्या असल्यामुळे हळूहळू वाढताना दिसत आहे. विदर्भातील (VIDARBH) यवतमाळ (YAVATMAL), गोंदिया (GONDIA), चंद्रपूर (CHANDRAPUR), नागपूर (NAGPUR), वाशिम (WASHIM)मधील किमान तापमान एक अंकावर आले आहे. त्यामुळे ठीक ठिकाणी शेकोट्या पेटवताना लोक दिसत आहेत. विदर्भासोबतच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा घसरला आहे. हिंगोली (HINGOLI) जिल्ह्याचे तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून तापमान १२  ते १३ प्रमाणात घटल्यामुळे जिल्ह्यात सर्व ठिकाणी थंडीची लाट पाहायला मिळत आहे. या काळामध्ये अनेक नागरिक येथे मॉर्निंग वॉक करताना आणि धावताना पाहायला मिळायचे, त्या ठिकाणी आता शेकोट्या सुद्धा दिसत आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी कमी झाली आहे. गेल्या आठवड्या शहराचे तापमान २०° c इतके होते मात्र समोर पासून मुंबईच्या किमान तापमानात तीन ते चार अंशांनी वाढ झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार २५ डिसेंबर नंतर मुंबई आणि उपनगरात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. १९ डिसेंबर रोजी मुंबईतील सांताक्रुज हवामान केंद्रात किमान तापमान २३.७° वर पोहोचले जे सामान्य तापमानापेक्षा सहा अंशांनी जास्त आहे. तर कुलाबा (CULABA) येथील हवामान केंद्रात किमान तापमान १९.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यापूर्वी १२ डिसेंबर रोजी हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती जी १९.४ अंश इतकी होती.

हे ही वाचा:

मिमिक्री ही एक कला…, कल्याण बॅनर्जी यांचे राज्यसभेचे सभापती धनखर प्रकरणावर स्पष्टीकरण

MI Playing 11 : लिलावात ८ खेळाडू खरेदी, तर IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे प्लेईंग इलेव्हन घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss