बीडमधील अंबाजोगाई शहरामध्ये भर दिवसा मोंढा परिसरामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. काठीने मारहाण करून या पाच जणांनी तरुणाचा निर्घुणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये खून करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे पाचही आरोपी हे मृत्यू झालेल्या तरुणाचे मामा आहेत. राजेंद्र श्रीराम कळसे (वय 37 वर्ष, रा. महसूल कॉलनी, अंबाजोगाई) मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. राम माणिकराव लाड, लक्ष्मण माणिकराव लाड, भारत माणिकराव लाड, बजरंग माणिकराव लाड, शत्रुघ्न माणिकराव लाड अशी आरोपींची नावे आहेत.
राजेंद्र कळसे हा अंबाजोगाई शहरातील पाटबंधारे विभागाच्या मांजरा कॉलनीमध्ये राहणारा रहिवासी होता. राजेंद्र कळसे आणि त्यांचे पाच मामा यांच्यामध्ये जागेवरून बऱ्याच दिवसांपासून वाद सुरु होते. यावरून अनेकदा त्यांच्यावरून अनेकदा वाद देखील झाले होते. राग मनात धरून पाचही मामांनी राजेंद्र कळस हा मोंढा परिसरात उभा असताना त्याला काठ्यांनी जबर मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर तो जागेवरच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये आशा कळसे यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र कळसे याचे मामा माणिकराव लाड, लक्ष्मण लाड, भरत लाड, बजरंग लाड आणि शत्रुघ्न लाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाई शहरामध्ये भर दिवसामध्ये झालेल्या खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजेंद्र कोळसे यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून जागेवरून वाद चालू होते. हा सर्व राग पाच मामांच्या मनात होता. त्या रागाच्या भरात त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी झाल्या. त्यानंतर पाचही मामांनी एकत्र येऊन दगडाने ठेचून व काठ्यांनी मारहाण राजेंद्र यांचे डोके फोडले. या मारहाणीमध्ये राजेंद्र जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता. त्यानंतर काही लोकांनी त्याला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. भरदिवसा घडत असलेल्या या सर्व प्रकारांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे ही वाचा:
भाजपाच्या नैतिकतेचे ऑडिट होणे गरजेचे आहे, संजय राऊत
मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक