Saturday, March 2, 2024

Latest Posts

MAHARASHTRA: राजू शेट्टींचे काटा बंद आंदोलन मागे

सांगलीमध्ये दोन दिवसांपासूनऊसाच्या दरासाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन सुरू करण्यात आले होते. ते आंदोलन आता दोन दिवसानंतर मागे घेण्यात आले आहे. आंदोलन मागे घेतल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केले असून स्वाभिमानच्या मागणीप्रमाणे दर देण्याचे दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

दोन दिवसीय आंदोलन ३६ तासानंतर मागे घेण्यात आले आहे. सांगली मधील दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याकडून स्वाभिमानीच्या मागणीपेक्षा अधिक दर देण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे ३६ तासांपासून सुरू असलेले वसंत दादा साखर कारखान्यासमोरचे आंदोलन राजू शेट्टी यांनी मागे घेतले. एफआरपी अधिक शंभर रुपये आणि मागील हंगामातील ५०  व १०० रुपये थकीत देणे बाकी होते. तर याच मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गेल्या दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यात आंदोलन सुरू झाल्यावर बैठकही घेण्यात आल्या होत्या, मात्र त्या निष्कळ ठरल्या. त्यामुळे स्वाभिमानी कडून गेल्या दोन दिवसांपासून राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काटा बंद आंदोलन करत आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका या आंदोलनात मांडण्यात आली होती. या आंदोलनामुळे कारखान्याचे गाळ देखील बंद झाले होते.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss