बिहारमधील कोसळलेल्या पुलाचं बांधकाम करणाऱ्या कंपनीलाच गोरेगाव उड्डाणपूलाचे काम

बिहार राज्यातील भागलपूर जिल्हयात गंगा नदीवर उभारला जात असलेल्या पुलाचे चार ते पाच खांब रविवार ४ जून रोजी पूल डिझाईन आणि तांत्रिक चुकीमुळे कोसळले.

बिहारमधील कोसळलेल्या पुलाचं बांधकाम करणाऱ्या कंपनीलाच गोरेगाव उड्डाणपूलाचे काम

बिहार राज्यातील भागलपूर जिल्हयात गंगा नदीवर उभारला जात असलेल्या पुलाचे चार ते पाच खांब रविवार ४ जून रोजी पूल डिझाईन आणि तांत्रिक चुकीमुळे कोसळले. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीवर उभारला जाणारा पूल कोसळला. या पुलाचे बांधकाम करणाऱ्या एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन कंपनीला गोरेगाव उड्डाणपूल, मुलुंड खिंडीपाडा व रत्नागिरी हॉटेल चौक येथील प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले आहे.त्यामुळे हे कंत्राट रद्द करण्यात यावे आणि या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्त डॉ इकबाल सिंग चहल यांना दिले आहे.

हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, त्यामुळे बिहारमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. यामुळे महापालिकेचा वेळ व पैसा वाया जाणार आहे. त्यामुळे पालिकेने या कंपनीला कोणतेही काम देऊ नये व झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी. भविष्यात अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे होणारा धोका टाळण्यासाठी मे. एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीस दिलेले कंत्राट महानगरपालिकेकडून रद्द करण्यात यावे आणि या कंपनीला काळया यादीत टाकावे असे पत्र रवी राजा यांनी पालिका आयुक्तांना दिले. 

स्थायी समितीच्या २० डिसेंबर २०२१ रोजी भरलेल्या सभेतील विषय क्रमांक १० अन्वये रत्नागिरी हॉटेल चौक, गोरेगाव येथे प्रस्तावित ६ पदरी उड्डाण पूल, मुलुंड, खिंडीपाडा येथे प्रस्तावित उच्च स्तरीय चक्रीय उन्नत मार्ग आणि डॉ हेडगेवार चौक येथे ६ पदरी उड्डाण पूल आदी कामांचे मे. एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीस ६६६,०६,७८,००० इतक्या रकमेचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे.मे. एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीतर्फे .या कंपनीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे. तसेच, कामामध्ये अनेक त्रुटीही आहेत. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा मुंबई शहरासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम मे. एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीने सुरु केले आहे.

हे ही वाचा:

Gautami Patil विठुरायाच्या चरणी नतमस्तक

संगमनेरमधील भगव्या मोर्चाला गालबोट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version