Friday, April 26, 2024

Latest Posts

संगमनेरमधील भगव्या मोर्चाला गालबोट

संगमनेर येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. वाढती गुन्हेगारी आणि लव्ह जिहाद विरोधात 'भगवा मोर्चा' काढण्यात आला होता.

संगमनेर येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. वाढती गुन्हेगारी आणि लव्ह जिहाद विरोधात ‘भगवा मोर्चा’ काढण्यात आला होता. दरम्यान या मोर्चातून गावाकडे परतत असताना हा प्रकार घडला. मोर्चादरम्यान वाद नेमका कशामुळे झाला, याबाबत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. या मोर्चानंतर मोठी दगडफेक झाली. दोन गटात मोठा राडा झाला. त्यामुळे अहमदनगरच्या समनापूर गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक गावांनी आज कडकडीत बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले. मात्र या मोर्चाला गालबोट लागलं आहे.

संगमनेर शहराजवळील समनापूर गावात दोन गटात तुफान दगडफेक झाली.या दगडफेकीमध्ये एकजण जखमी झाला असून अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. पोलीस घटनास्थाळी पोहचले असून शांत राहण्याचे सल्ले पोलिसांकडून करण्यात येत आहे. अनेक गाड्यांचे यात नुकसान झाले आहे. एक जण जखमी झाला आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलीस घटनास्थळी दाखल आहेत. सध्या समनापूर गावात तणावाची परिस्थिती आहे. मोर्चादरम्यान वाद नेमका कशामुळे झाला, याबाबत माहिती मिळू शकली नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा प्रदीर्घ काळासाठी पाठीशी घातले जातात तेव्हा ते नियंत्रणाबाहेर जातात. संगमनेर शहरात जो जनआक्रोश झालाय तो गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई न होणे, पोलीस प्रशासनावर दबाव टाकणे यामुळे झाला आहे, असं भाजप खासदार सुजय विखे पाटलांनी म्हटलं.

हिंदु समाजावर होणारे हल्ले, वाढती गुन्हेगारी आणि लव्ह जिहाद या प्रवृत्तीच्या विरोधात भगवा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी संगमनेर तालुयातील अनेक गावांत कडकडीत बंद पाळला. मोर्चात महिला आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यावेळी खा. सुजय विखे म्हणाले, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा प्रदीर्घ काळ पाठीशी घातले जातात तेव्हा ते नियंत्रणाबाहेर जातात. संगमनेर शहरात जनआक्रोश झालाय तो गुन्हेगारी लोकांवर कारवाई न होणे, पोलीस प्रशासनावर दबाव टाकणे यामुळे झाला आहे. महाविकास आघाडीच्या कालावधीत पोलींसावर दबाव टाकला गेला. कुणाचे तरी पाठबळ असल्याशिवाय छोट्या गोष्टीहून मोठ्या प्रकारचे वाद होत नाहीत, असा प्रत्यक्ष निशाणा सुजय विखे यांनी साधला आहे.

हे ही वाचा:

Gautami Patil विठुरायाच्या चरणी नतमस्तक

शिरूर येथील मतदारसंघाचा तिठा काही सुटेना ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss