Nashik, देवीच्या दर्शनाला सप्तशृंगी गडावर जाताय? तर व्हा वेळीच सावध

सध्या मे महिन्याच्या कालावधीत लहान मुलांना व अनेकांना सुट्टी असते. त्यामुळे या महिन्यात अनेकजण फिरण्यासाठी व देवदर्शनासाठी आपल्या परिवारासोबत जातात. उत्तर महाराष्ट्रात वसलेल्या सप्तशृंगी गडावर श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला अनेक भाविक येत असतात.

Nashik, देवीच्या दर्शनाला सप्तशृंगी गडावर जाताय? तर व्हा वेळीच सावध

सध्या मे महिन्याच्या कालावधीत लहान मुलांना व अनेकांना सुट्टी असते. त्यामुळे या महिन्यात अनेकजण फिरण्यासाठी व देवदर्शनासाठी आपल्या परिवारासोबत जातात. उत्तर महाराष्ट्रात वसलेल्या सप्तशृंगी गडावर श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला अनेक भाविक येत असतात. सध्या सुट्टी असल्या कारणाने अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. सप्तशृंगी गड लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे दैवत असल्याने येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात. अनेक भाविक दर्शनासाठी आल्यामुळे येथे भाविकांचे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यात मे महिना म्हणजे सुट्टीचा महिना असून या कालावधीत अनेक भावीक श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शन घेण्यासाठी येतात. त्यामुळे मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी होते. आणि याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे हे सक्रिय झाले आहेत. भाविकांमुळे होत असलेल्या गर्दी मुळे चोरटे हे चोरी करण्यासाठी मोकळे सुटले आहे.

हल्लीच श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावर सोन चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी वर्षभर गर्दी असते पण यावर्षी ही गर्दी जास्त झाली होती. सुट्ट्यांमुळे अनेकजण या ठिकाणी आपल्या परिवारासोबत देवीच्या दर्शनासाठी आलेले होते. श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविक अगदी लांबून येत असल्याचे दिसून येते. देवीच्या दर्शनासाठी भाविक महाराष्ट्रातून नव्हेच तर इतर राज्यातूनदेखील येत आहेत. आणि याच गोष्टीचा फायदा चोर करत आहेत. या चोरीच्या प्रकरणात महिला चोरांच्या टोळीचा मोठा हात आहे. प्रामुख्याने एसटी बसमध्ये चढताना, गडावर जात असताना, गडावर जाऊन फुल वर प्रसाद घेत असताना, दर्शनासाठी रांगेत उभे असताना, देवीच्या गाभाऱ्यात चोरीचे प्रकार दिसून येत आहेत. अशीही एक चोरीची घटना ही बारामतीहून आलेल्या भाविक महिलेबाबत घडली आहे. या महिलेकडे सोन्याचा हार असून तो चोराने लंपास केला. बारामतीहून आलेल्या महिलेच्या पर्समध्ये ८७ हजारांचा तीन तोळे वजनाचा तारणहार होता. ही महिला आपल्या परिवारासह श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आली होती. देवीचे दर्शन घेऊनझाल्यावर रोपवे च्या दिशेने जात असताना कोणीतरी चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्या महिलेचा सोन्याचा हार चोरला.

अश्या चोरीच्या घटना होत असल्याने सध्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर महिला देवीच्या दर्शनाला अगदी भारतीय संस्कृतीला साजेसा असा पोशाख परिधान करून व अंगावर दागदागिने घालून येतात. तसेच मागील काही दिवसांपासून एसटीच्या दारात महिलांना ५०% सूट देण्यात आली असून आजकाल महिला प्रवास करण्यासाठी महामंडळ बसचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. आणि अश्या चोरीच्या घटना सध्या वारंवार घडत असून सध्या नागरिकांमध्ये त्यात खास करून महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी लाखो नागरिक येत असतात. त्यातून अश्या चोरीच्या घटना या सातत्याने घडत आहेत. महिलांचे मंगळसूत्रे, सोन्याचे दागिने, पर्स मधून पैसे तसेच पुरुष्यांच्या पाकिटांमधून पैसे, नागरिकांचे मोबाईल्स मोठ्या प्रमाणावर चोरीला जात आहेत. याच चोरांच्या टोळीत ६ ते ७ महिलांचा समावेश असून पोलिसांसमोर या टोळीला पकडण्याचे मोठे आव्हान उभे आहे.

हे ही वाचा : 

Karnataka च्या निकालानंतर Raj Thackeray यांची पहिली प्रतिक्रिया, भारत जोडो यात्रेचा…

एका Instagram पोस्टमुळे अकोल्यातील हिंसा भडकली? कारण आलं समोर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Exit mobile version