spot_img
Thursday, February 22, 2024
spot_img

Latest Posts

१८ जणांच्या ग्रुपसह गेलेला निखिल परत घरी परातलाच नाही…

सध्या मे महिना सुरु आहे. मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीचा हा कालावधी असतो. लोक या सिझन मध्ये फिरायला जाण्यास पसंती दाखवतात. आपल्या घरातली मंडळी , मित्र - मैत्रिणीचा ग्रुप अनेक ठिकाणी फिरायला जाण्यास पसंती देतात.

सध्या मे महिना सुरु आहे. मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीचा हा कालावधी असतो. लोक या सिझन मध्ये फिरायला जाण्यास पसंती दाखवतात. आपल्या घरातली मंडळी , मित्र – मैत्रिणीचा ग्रुप अनेक ठिकाणी फिरायला जाण्यास पसंती देतात. असाच एक ग्रुप माथेरानच्या पेब किल्ला येथे फिरायला गेला होता. हा ग्रुप एकूण १८ जणांचा होता. हा ग्रुप कील्ला फिरण्यासाठी म्हणून गेले होते. मात्र तिथे त्यांच्या सोबत एक घटना घडली. माथेरान शेजारील पेब कील्ला( विकट गड) येथे गेलेल्या ग्रुप मधील १८ वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला . या मुलाचे नाव निखिल तनिर असे आहे.

निखिल तनिर हा कांदिवलीच्या राहणार आहे. निखिल तनिर नावाचा मुलगा हा पेब किल्यावरून रविवारी दुपारपासून गायब झाला होता. त्यांच्या ग्रुपमधून निखिल जेव्हा बेपत्ता झाला टेंबवह त्यांच्याकडून शोधण्याचा आटोकाट प्रयत्नकरण्या आला. त्याला त्याच्या फोन वर देखील कॉल लावण्याचा प्रयत्न केला .परंतु त्याचा फोन लागताच नव्हता. गडाच्या , किल्ल्याच्या सगळ्या भागात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु गडावर दिसलाच नाही. निखिल ज्या ग्रोउपमधून गेला होता त्यांच्या कडून प्रयत्न हे चालूच होते मात्र संध्याकाळच्या वेळेस अंधार झाल्या नंतर ग्रुप मधल्या लोकांनी गडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. आणि ताबडतोब निखिल च्या घरच्यांना झालेला सगळं प्रकार सांगण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि त्याप्रमाणे घडलेल्या सगळ्या प्रकारची माहिती निखिलच्या घरच्यांना सांगितली. त्यानंतर पनवेल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

निखिल सोबत असणाऱ्या साथीदारांनी माथेरान येथील सह्याद्री आपत्कालीन संस्थेच्या सदस्यांना झालेला प्रकार सांगून त्यांच्या कडून सकाळी ८ वा सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने निखिलची बॉडी जवळपास १००० फुट खोल दरीत असल्याचे सांयकाळी ४ वाजता समजले यानंतर सर्व रेस्क्यु साहीत्य पेब कील्ल्यावर पोहचवण्यासाठी जवळपास सायंकाळी ७ वाजलेले एकदरींत ७:३० वाजताच्या दरम्यान रेस्क्यु ऑपरेशन सुरु झाले आंधारामुळे रेस्क्यु मध्ये अनेक अडचणी येत होत्या. मात्र यावेळी कर्जत माथेरान आपदा मित्र, माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांनी स्वत: जातीने हजर राहुन या रेस्क्युमध्ये सहभाग नोंदवला होता. निखिलचा मृत्युदेह १००० फुट खोल दरीतुन मध्य रात्री २ वाजता बाहेर काढुन कील्ल्यावर आणला. मात्र मृत्युदेहाला दुर्गंधी येत असल्याने बॉडी उचलुन आणने शक्य नव्हते या दरम्यान गडावरील दुरुस्ती साठी वापरण्यात येणारी कड्यावरचा गणपती साकारलेल्या राजा खडे यांनी निर्माण केलेली ना दुरुस्त असलेली ट्रॉली काही सदस्यांनी रात्री दुरुस्त करुन रेस्क्यु टिमने या ट्रॉलीच्या साहय्याने सदर मृत्युदेह नेरळ-माथेरान रेल्वे ट्रॅकवर आणला. व तेथून ३ की. मी चे अंतर कापत पहाटे ६ वाजताच्या दरम्यान नेरळ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला. कशाचा विलंब ना करता निखिलच्या घरच्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात पालक पोहोचले.

या रेस्क्यु दरम्यान नेरळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर साहेब यांनी जवळपास २२ जणांच्या संपुर्ण रेस्क्यु टिम करीता पाणी व जेवणाची व्यवस्था करुन या रेस्क्युवर स्वत: जातीने लक्ष घातले होते. त्याच बरोबर या टिमला पाणी व नाष्ट्याची व्यवस्था प्रांत कार्यालय व तहसिल कार्यालय कर्जत-खालापुर यांच्याकडुन देखील करण्यात आली होती. या रेस्क्यु ऑपरेशनला माथेरान सह्याद्री रेस्क्यु टिमचे वैभव नाईक, सुनिल कोळी, सुनिल ढोले, चेतन कळंबे,संदीप कोळी, धिरज वालेंद्र,उमेश मोरे, मंगेश उघडे,राहुल चव्हाण,महेश काळे यांच्यासह कर्जत व माथेरान आपदा ग्रुपचे काही नवीन सदस्य देखील या रेस्क्यु मध्ये खांद्याला खांदा लावुन हीरहीरीने काम करत होते.

हे ही वाचा : 

Mrs Asia GB सिझन एकची फायनलिस्ट मराठमोळी इन्फ्लुएंसर

‘द केरला स्टोरी’ च्या निर्मात्यांचं जगाला रोखठोक उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss