Friday, April 19, 2024

Latest Posts

बुलढाण्यामध्ये विषबाधा झालेल्या रुग्णांवर रस्त्यावर उपचार,सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

बुलढाण्यातील लोणार तालुक्यात मंगळवारी एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त वाटण्यात आलेल्या भगर आणि आमटीमधून जवळपास पाचशे ते सहाशे नागरिकांना विषबाधा झाली आहे.

बुलढाण्यातील लोणार तालुक्यात मंगळवारी एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त वाटण्यात आलेल्या भगर आणि आमटीमधून जवळपास पाचशे ते सहाशे नागरिकांना विषबाधा झाली आहे. अनेक नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये ४०० ते ५०० रुग्ण एकाचवेळी उपचारासाठी आल्याने अनेक रुग्णांवर अक्षरशः रस्त्यात झोपवून रात्रीच्या वेळी उपचार करण्यात आले आहे. ३० खाटांचे रुग्णालय इतर रुग्णांना खाली ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. रस्त्यांवर उपचार केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुंबईतील न्यायालयीन मित्र मोहित खन्ना यांनी न्यायालयाला रुग्णालयाबाहेर रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा व्हिडिओ दाखवल्याने सगळीकडे एकाच खळबळ उडाली. न्यायालयाने या घटनेबाबत स्वयंप्रेरणेने जनहित याचिका दाखल केली आहे.

लोणारमध्ये नागरिकांना भगर आणि आमटी मधून विष बांधा झाल्याने राज्य सरकारच्या सरकारी रुग्णालया बाहेर रुग्णांनाची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे रुग्नांवर रस्त्यावर उपचार केले जात आहेत. त्यामुळे राज्य सरकारची रुग्णालय रुग्णांवर रुग्णालय बाहेर रस्त्यात कसे उपचार करू शकतात? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. जवळपास ३०० ते ४०० रुग्णांवर रुग्णालयाच्या बाहेर उपचार केले जात आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशभरातून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर झाली आहे. या घटनेमध्ये एखाद्या रुग्नांची प्रकृती गंभीर किंवा चिंताजनक झाल्यानंतर काय केलं असतं? असा प्रश्न राज्य सरकारला विचारण्यात आला आहे.

एकाच वेळी ४०० ते ५०० रुग्णांना विषबाधा झाल्याने सगळीकडे खळबळ उडाली होती. रुग्णालयात जागा पुरत नसल्याने अनेक रूग्णांवर चक्क रस्त्यवर झोपवून उपचार केले जात आहेत. दोऱ्या बांधून त्यावर सलाईन लटकावून उपचार करण्यात आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असल्याने देशभरातून सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यावर याचिका दाखल करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

शारीरिक अडचणी असतांना सुद्धा पवार साहेब रायगडावर गेले; छगन भुजबळांनी केले शरद पवारांचे कौतुक

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आले अडचणीत, वाघाची शिकार केली अन्…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss