मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चव घेऊ शकते;पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे इच्छुक

पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र केला.

मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चव घेऊ शकते;पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे इच्छुक

पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर त्यांनी सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांची भेट घेतली. मात्र त्यांनी आता आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढण्याचा निर्धार केला आहे. वसंत मोरे म्हणाले, मी लोकसभा लढणारच, पुण्याची निवडणूक (Pune Lok Sabha Election 2024) एकतर्फी होणार नाही, मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते, असे वसंत मोरे म्हणाले. वसंत मोरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातून सध्या भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. तर महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या नावाची चर्चा केली जात आहे. मात्र आता वसंत मोरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे.

वसंत मोरे म्हणाले, अनेक मुद्द्यांना घेऊन मी पुणेकरांसमोर जाणार आहे. सभेतून मी माझी मत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर अनेक भाजप नेते बोलले की ही निवडणूक एकतर्फी करू. पुणेकर कधीच कुणाला एकतर्फी निवडून देत नाहीत. रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीट दिलं तर ते आमदारकीवरून खासदारकी लढवतील, मी अजूनही लोकसभेच्या रिंगणात आहे, असे वसंत मोरे म्हणाले. काही दिवसांआधी वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहत मनसेला राजीनामा दिला. त्यांनी लिहिलेले पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. मात्र आता वसंत मोरे यांना लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. मात्र आपल्याबद्दल पक्षांतर्गत राजकारण करुन, आपला रिपोर्ट निगेटिव्ह दाखवल्याचा दावा,वसंत मोरे यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी मनसेला राजीमाना दिला.

पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेला राजीनामा दिल्यानंतर त्यांनी लगेच शरद पवार यांची भेट घेतली. पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या गटात सामील झाले,त्या दिवशीच वसंत मोरे यांनीसुद्धा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे शरद पवारांच्या गटात वसंत मोरे जाणार अश्या चर्चा रंगल्या होत्या.

हे ही वाचा:

राजकीय हालचालींना वेग, BRS सोबत प्रकाश आंबेडकरांची बोलणी सुरु

महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष – खासदार संजय राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version