Thursday, May 9, 2024

Latest Posts

महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष – खासदार संजय राऊत

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर आहेत.

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर आहेत. मात्र त्यांच्या या सभेआधीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगली लोकसभेसाठी दावा केला आहे. सांगली लोकसभेची जागा आता नेमकी कोणाच्या पारड्यात जाणार? याची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. राजकीय नेत्यांची उत्सुकता वाढल्याने सगळीकडे अनेक चर्चा रंगल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील एखादी जागा आमच्याकडे असावी आणि ती ताकदीने लढवावी, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे. त्यामुळे आता सांगली लोकसभेची जागा कोणाकडे जाते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

संजय राऊत म्हणाले, कोल्हापूरची जागा आमची असून सुद्धा ती आम्ही हसत हसत सोडून दिली. याच्या आम्हाला यातना झाल्या. त्यामुळे आमचे कार्यकर्ते म्हणत आहेत आपण सांगलीची जागा लढवूया.शरद पवार यांची आज सकाळी भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि मी आमचे प्रमुख नेते कोल्हापूरकडे रवाना होणार आहोत. याठिकाणी श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देणार आहोत आणि तसेच त्यांचे आशीर्वाद घेणार आहोत, असे खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच सांगलीमध्ये गेल्यानंतर वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाकडे जाऊन श्रद्धांजली देखील आम्ही अर्पण करणार आहोत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने बोलताना राजू शेट्टी यांच्याशी देखील चर्चा सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखादी जागा असाव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने ताकदीने लढवावी यामध्ये काही चुकीच असल्याचं मला वाटत नाही, असे संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलतांना संजय राऊत म्हणाले, काँग्रेस हा पक्ष देशातील सगळ्यात मोठा पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत. सर्व पक्ष येऊन एकत्र येत इंडिया आघाडी झाली आहे. आम्ही राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड झारखंड याठिकाणी जागा मागत नाही. प्रादेशिक पक्ष आपला राज्यातील सीट मागतो आहे. त्यांचं अस्तित्व कार्यकर्ते त्यावर अवलंबून असतं. ते पुढे म्हणाले की, भिवंडीबाबत आम्ही सगळे एकत्र आलो, तर ती जागा आम्ही भाजपकडून काढून घेऊ. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघेही भिवंडी जागेबाबत दावा करत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

संजय राऊतांच्या टीकेला मोदींचे प्रतिउत्तर, नरेंद्र मोदी म्हणाले…

चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर होणार का? उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss