Thursday, May 9, 2024

Latest Posts

राजकीय हालचालींना वेग, BRS सोबत प्रकाश आंबेडकरांची बोलणी सुरु

मागील अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि महायुतीमध्ये युती होणार, अश्या चर्चा रंगल्या आहेत.

मागील अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि महायुतीमध्ये युती होणार, अश्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र आता ही चर्चा फिस्कटते की काय असा प्रश्न सगळ्यांचं पडला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आपल्या रोजच्या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलत असतात. ते नेहमी वंचित बहुजन आघाडीच्या भूतकाळाबद्दल बोलत असतात. मात्र आता त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले, बाळासाहेब आंबेडकर हे सन्मान नेते आहेत. त्यांच्यासोबत आमची बऱ्याच वेळा चर्चा झाली.त्यांनी ४ जागा लढवाव्यात. आम्ही सूचना केल्या आहेत, हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसत आहे. तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता, तर आम्हाला आनंद झाला असता, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, या हुकूमशाहीच्या लढायला संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे गती आणि बळ आम्हाला नक्कीच मिळाल असतं. आम्हाला अजून देखील खात्री आहे सर्व प्रमुख नेते एकत्र बसतील आणि पुन्हा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील. तुमच्या मनात काही नाराजी असेल ती दूर करण्यासाठी आम्हाला यश येईल. वंचित दलित समाज या लढ्यात असायलाच पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा बीआरएस पक्ष कामाला लागला आहे. प्रकाश आंबेडकर आणि के. चंद्रशेखर राव यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याचे समोर आले आहे.

महाविकास आघाडीसोबत युती करण्याचा निर्णय फिस्कटल्याने प्रकाश आंबेडकरांनी वेगळे पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि बीआरएस पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे. महाराष्ट्रामध्ये आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी बीआरएस वंचितसोबत युती करण्यास इच्छुक आहे. के. चंद्रशेखर राव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना २ मोठ्या कार्यक्रमांसाठी बोलावले होते.

हे ही वाचा:

महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष – खासदार संजय राऊत

पवार कुटुंबातील राजकीय लढाईवर सरोज पाटील यांनी दिली प्रतिक्रिया, राजकारण घरात आणलं…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss