Sunday, May 19, 2024

Latest Posts

पुण्यात दिवसाढवळ्या बिल्डर नवऱ्याची बायकोकडून हत्या

पत्नीने आपल्या बॉयफ्रेंडच्या साहय्याने पतीची हत्या केल्याची दुसरी घटना समोर आली होती. त्यानंतर आता ही घटना समोर आल्याने पुण्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

पुणे शहरातील वानवडी पोलीस (Pune news) स्टेशनच्या हद्दीतून (Pune Crime news) एक खळबळजनक घटना उघडकीस आली. पत्नीने केलेल्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिक असलेल्या पतीचा मृत्यू झाला. घरगुती भांडणातून वाद झाल्यानंतर पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वानवडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. निखिल पुष्पराज खन्ना (वय 36) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रेणुका निखिल खन्ना (वय 38) यांना वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

नेमकं काय घडलं?
याप्रकरणी माहिती अशी की, निखिल आणि रेणुका यांचा सहा वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. दरम्यान आज दुपारच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात पत्नी रेणुका हिने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. त्यानंतर तिने फोन करून सासरे असलेल्या डॉक्टर खन्ना यांना याची माहिती दिली. डॉक्टर खन्ना घरी आले आणि त्यांनी निखिल यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही आणि निखिल यांचा मृत्यू झाला होता. मयत निखिल हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आहेत. वानवडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत आई-वडील पत्नी असे चार जण ते राहतात. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी रेणुका खन्ना हिला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.


पत्नी मद्यप्राशन करुन होती?
रागाच्या भरात रेणुका यांनी निखिल यांच्या नाकावर जोरात ठोसा लगावला. त्यामुळे त्यांच्या नाकाचे आणि तोंडाचे हाड फ्रॅक्चर झाले. त्यातच मोठा रक्तस्त्राव झाल्याने ते बेशुद्ध पडले त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे. पत्नी मद्यप्राशन करुन असल्याचा संशय पोलिसांना आहे.

पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्यात कौटुंबिक हिंसाचारातदेखील वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांत पत्नीकडून पतीची हत्या करण्यात आल्याच्या दोन घटना समोर आल्या आहे. पती दारु पीत असल्याने पत्नीने पतीचा खून केल्याची घटना घडली होती तर पत्नीने आपल्या बॉयफ्रेंडच्या साहय्याने पतीची हत्या केल्याची दुसरी घटना समोर आली होती. त्यानंतर आता ही घटना समोर आल्याने पुण्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

MMRDA बैठकीत खासदार DR. SHRIKANT SHINDE यांच्या मागणीला यश

MAHARASHTRA: IRCTC वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांना मनस्ताप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss