Friday, May 17, 2024

Latest Posts

तब्ब्ल चार वर्ष होतोय बलात्कार; समुपदेशकाच्या वर्गात घटना उघड

वडील आणि मुलीच नातं हे सगळ्यात घट्ट नातं म्हणून ओळखलं जात. वडिलांसाठी स्वतःच्या मुलीहून अधिक महत्वाचं काहीच नसत. पण आता मुलगी आणि वडील या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील एका मुलीवर चार वर्ष लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. हा अत्याचार मुलीचे आजोबा, चुलता आणि वडिलांकडून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील एका कॉलेजमध्ये समुपदेशकांचा(Counselor) तास चालू होता. या समुपदेशकांच्या तासाच्या वेळी मुलीने समुपदेशकांना तिच्या बरोबर घडलेल्या प्रकाराबद्दल तिने सांगितले. त्यानंतर ही संपूर्ण घटना उघड झाली. ही घटना ऐकून समुपदेशकांना धक्का बसला आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांना पुण्यातील विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलीच्या आईवडिलांची परिस्थिती चांगली नसल्यामुळे तिचे आई वडील पुण्यात मजुरीची काम करतात. पैश्याच्या अभावामुळे मुलीच्या आई वडिलांनी मुलीला गावी पाठवून दिले होते. दोन वर्ष मुलीला गावी ठेवण्यात आले . याच दरम्यान मुलीच्या चुलत्याने आणि आजोबांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. त्याचबरोबर मुलीचे आजोब वारंवार मुली बरोबर अश्लील कृत्य करत होते. या संदर्भात मुलीने तिच्या चुलत्यांचा आणि आजोबांना विरोध केला होता. पण तरीही दोघांकडून मुलीवर वारंवार अत्याचार होत राहिला. मुलीने आई वडिलांना पत्र लिहून कळवले होते. दोन वर्षानंतर पुण्यात तिच्या आई वडिलांजवळ परतल्यावर तिने पुन्हा या संदर्भात तिच्या आई वडिलांना सांगितले. परंतु त्यानंतर वडिलांनीच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आई काही कारणास्तव बाहेर गेली असता वडील तिच्यावर अत्याचार करायचे, असं पीडितेनं सांगितलं.

सध्या पुण्यातील अनेक संस्था विविध शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये मुलींसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या समुपदेशनाचा वर्ग घेत आहेत. यासाठी
मानसशास्त्रज्ञ आणि वैद्य शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. या संवादातून विद्यार्थ्यांचे मागर्दर्शन केले जात . लैंगिकतेबाबत माहिती दिली जाते. त्यासोबतच गुड टच, बॅड टच याची देखील उत्तम प्रकारे माहिती दिली जाते. यामुळे विद्यार्थिनींना लैंगिक छळाबाबत माहिती मिळते. यामुळेच विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाचे प्रकार उघकीस येत आहेत.

राज्यातील पदभरतीचा मार्ग अखेर मोकळा; ‘या’ कंपन्या घेणार परीक्षा

Latest Posts

Don't Miss