Sunday, May 19, 2024

Latest Posts

आमदार रविंद्र धंगेकर ललित पाटील प्रकरणी पुन्हा एकदा आक्रमक

पुण्यातील ससून रुग्णालयातील ललित पाटील प्रकरणी (Lalit Patil Drug Case) आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.

पुण्यातील ससून रुग्णालयातील ललित पाटील प्रकरणी (Lalit Patil Drug Case) आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. पुणे पोलीस ललित पाटील प्रकरणी कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे मी बुधवारपासून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे, असा इशारा रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे. ललित पाटील हा क्राईम ब्रॅंचमधील एका अधिकार्‍यांच्या संपर्कात होता. त्या अधिकाऱ्यांसोबत तो व्हिडीओ कॉलवरुन बोलायचा, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

ललित पाटील प्रकरणात ससुन रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. डॉक्टर ठाकूर यांना पदमुकक्त केल्यानंतर नवीन डीन डॉक्टर विनायक काळे यांना अजुनही पदभार दिलेला नाही. ससून हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. ससुन रुग्णालयातील कोणावरही पुणे पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे शासनाची नाचक्की होतेय. पुणे पोलिसांकडून ससून रुग्णालयातील क्लार्क महेंद्र शेवतेला अटक होण्याची गरज आहे. त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा होईल. पुणे पोलीस ललित पाटील प्रकरणात कारवाई करत नसल्याने मी बुधवारपासून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार, असा इशारा रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे.ललित पाटील प्रकरणात देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नाही आहे. पुणे पोलीसांना कोट्यावधी रुपयांचा हप्ता मिळतो. पुण्यात हुक्का पार्लय, पब, बार अशा अनेक ठिकाणी गैरप्रकार होतात. या गैर प्रकारावर आळा घालण्यात यावा. ललिल पाटील ड्रग्स प्रकरणाबाबत विधिमंडळात विषय मांडणार आहे. यासंदर्भात विविध मागण्यादेखील करणार आहे. मात्र मला या प्रकरणाबाबत विधिमंडळात किती बोलू देतील याबाबत शंका आहे. या प्रकरणात शासनाचा हलगर्जीपणा पुढे येत आहे. हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे दिला गेला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

मागील काही दिवसांपासून पुण्यात ललित पाटील ड्रग्स प्रकरण चांगलंच पेटलं आहे. यात ललित पाटीलला अनेकांनी मदत केल्याचे समोर आले आहे. ससून रुग्णालयातील डीन डॉ. संजीव ठाकुर आणि डॉ. देवकाते यांनी ललित पाटीलला मत केल्याचे चौकशी समितीत निष्पन्न झाले आहे. मात्र तरीही त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे धंगेकर म्हणाले आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्राच्या लाडक्या आदेश बांदेकर भाऊजींचा ‘होम मिनिस्टर’ पर्यंतचा प्रवास शिंदे सरकारची आंदोलनं आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष तयारी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss