Saturday, July 27, 2024

Latest Posts

पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद, चारही धरणात दहा टक्के कमी पाणीसाठा

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पाणी पुरवठा आज बंद करण्यात आला आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पाणी पुरवठा आज बंद करण्यात आला आहे. देखभालीच्या कामासाठी आज शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे पाटबंधारे विभागाने पुणे महानगरपालिकेला (Pune Municipal Corporation) पाणी बचत करा अश्या सूचना दिल्या आहेत. त्याला कारण तसेच असल्यामुळे पाणीपुरवठा बंद केला आहे. पुण्याला पुरवठ करणाऱ्या चारही धरणात गतवर्षीपेक्षा यंदा कमी पाणी आहे. त्यामुळे जानेवारी महिना येणाच्या आधीच पुणे शहरातही पाणीपुरवठा कपात करण्यात आला आहे. पुणेकरांनो आत्तापासूनच पाणी जपून वापर असे आव्हान करण्यात आले आहे.

पुणे शहरात पाणी बचत करा, अशा सूचना पाटबंधारे विभागाने पुणे महानगरपालिकेला दिल्या आहेत. पुणे शहरात तूर्तास तरी पाणी कपातीचा निर्णय झाला नसला तरी धरणातील कमी झालेला एकूण पाणीसाठा चिंतेची बाब ठरू लागली आहे. चार धरणात ७८.४७ टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षी हाच साठा ८८.४१ टक्के इतका होता. म्हणजेच, गतवर्षीपेक्षा दहा टक्के कमी पाणी चार धरणात आहे. मागच्या वर्षी आजच्या तारखेला चार धरणातील पाणीपुरवठा ८८.४१ टक्के एवढा होता. तर या वर्षी आजच्या तारखेला पाणीसाठा ७८.४७ टक्के इतका आहे. यंदाच्या वर्षी पाऊस खूप कमी प्रमाणात पडल्यामुळे काही प्रमाणात पाणीसाठ्यात कपात करण्यात आली आहे. पुण्याला पाणीसाठा करणाऱ्या चार धरणात गेल्यावर्षी पेक्षा दहा टक्के कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पुणेकरांवर आत्तापासूनच पाणी कपात करण्याची वेळ आली आहे.

यंदाच्या वर्षात पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे पुणेकरांवर आत्तापासूनच पाणी संकट कोसळल आहे. पुण्यातील धरण देखील १०० टक्के भरली नाही. त्यामुळे उपलब्ध पाणी साठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. तसेच या पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करावा लागणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा अन्यथा जानेवारीपासून पाणीकपात करण्याचा इशारा महापालिकेकडून जलसंपदा विभागाला देण्यात आला होता.

हे ही वाचा:

POLITICS: दिल्लीपुढे महाराष्ट्राला झुकवू नका, ROHIT PAWAR यांचा सरकारला इशारा

मराठवाड्यातील कुणबी नोंदीची आकडेवारी आली समोर, कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी सापडल्या?

 Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss