Sunday, May 19, 2024

Latest Posts

कुस्तीचा धुरळा उडणार पुण्यात, पैलवान मैदानात सज्ज

कुस्ती (wrestling) म्हंटल कि डोळयांपुढे लालमातीत माखलेला पैलवान येतो. कुस्तीचा सामना बघण्यासाठी ग्रामीण भागात लाखो लोक जमा होतात. गावाकडे कुस्तीचे वेगळे वेड आहे. पैलवान आतुरतेने कुस्तीची वाट पाहत असतात. कुस्तीसाठी केली जाणारी तयारी फार आश्चर्यकारक असते.

कुस्ती (wrestling) म्हंटल कि डोळयांपुढे लालमातीत माखलेला पैलवान येतो. कुस्तीचा सामना बघण्यासाठी ग्रामीण भागात लाखो लोक जमा होतात. गावाकडे कुस्तीचे वेगळे वेड आहे. पैलवान आतुरतेने कुस्तीची वाट पाहत असतात. कुस्तीसाठी केली जाणारी तयारी फार आश्चर्यकारक असते. पैलवान कुस्तीसाठी खूप कष्टाची तालीम घेत असतात. लाल माती आणि पैलवान हे कुस्तीखेळामध्ये लोकांना आकर्षित करतात. पैलवानाच्या चालणार कुस्तीचा सामना बघायला लोकांना खूप आवडते. अश्या या कुस्तीच्या सामन्याला आज सुरवात होणार आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा ( Maharashtra Kesari Wrestling Competition) सामना आज म्हणजेच १० जानेवारी पासून पुण्यात (Pune) रंगणार आहे. १० जानेवारी ते १४ जानेवारी पर्यंत महाराष्ट्र केसरी स्पर्धा चालणार आहे. तब्बल ९०० पैलवानांचा थरारक सामना लोकांना पुण्यात बघायला मिळणार आहे. महाराष्ट्र केसरी विजेत्याला महिंद्रा थार जीप तसेच ५ लाखाची रोख रक्कम मिळणार आहे. स्पर्धेचे उदघाटन १० जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता होणार असून, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्वर दत्त उदघाटनाला उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील कोथरुड (Kothrud) मधील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी पैलवान, या आखाड्यात कुस्तीचा सामना भरणार आहे, अशी बातमी महाराष्ट्र केसरीचे प्रमुख संयोजक माजी महापौर मुरलीधर मनोहर यांनी दिली आहे.

६५ महाराष्ट्र केसरी कुस्तीचा आखाडा हा ३२ एकरमध्ये आखण्यात आला आहे. यामध्ये १२ एकरमध्ये ८० हजार आसनक्षमतेचे मैदान, दोन माती आणि तीन गादीचे आखाडे आहेत. तसेच जेष्ठ नागरिक, व्हीआयपी लॉग, पैलवान, स्त्रिया, पत्रकार यांच्यासाठी वेगळी प्रेक्षक गैलरी उभारण्यात आली आहे. २० एकर जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबत आरोग्य, अग्निशमन,अश्या सुरक्षेचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे.

पैलवानांच्या आरोग्याचा विचार करून कार्डियाक (Cardiac) डॉक्टर, तसेच अन्य डॉक्टरांची टीम आणि अँब्युलन्स (Ambulance) ची व्यवस्था करण्यात आली आहे, सोबत १००० पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. ६५ महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तब्बल ४५ तालीम संघातील विविध १८ वजनी गटात सुमारे ९०० पेक्षा अधिक पैलवान स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

हे ही वाचा:

कर्णधार रोहित शर्माने टी-२० क्रिकेटला दिला निरोप? पत्रकार परिषदेत केला मोठा खुलासा

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रश्मिका मंदान्ना यांच्या चित्रपटाचा ट्रेलर आला समोर, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार चित्रपट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss