Saturday, July 27, 2024

Latest Posts

७ फेब्रुवारीपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाण्याची शक्यता, प्रलंबित मागण्यांसाठी संप

राज्यभरातील निवासी डॉक्टर पुन्हा एकदा संपावर जाण्याची शक्यता आहे.

राज्यभरातील निवासी डॉक्टर पुन्हा एकदा संपावर जाण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यासाठी संप पुकारण्यात येणार आहे. निवासी डॉक्टरांकडून (Resident Doctor) राज्यव्यापी संपाची (Strike) हाक देण्यात आली आहे. अनेकदा संप करूनसुद्धा सरकार केलेल्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने,राज्यातील डॉक्टरांनी पुन्हा एकदा संप पुकरण्याचे पाऊल उचलले आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील निवासी डॉक्टरसुद्धा या संपात सहभागी होणार आहेत. याबाबतचे अधिकृत पत्रक काढण्यात आले आहे.

निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीने काढलेल्या परिपत्रकामध्ये म्हटले आहे, मागील अनेक दिवसांपासून राज्यातील निवासी डॉक्टरांच्या काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “ गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील निवासी डॉक्टरांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. गेल्या एक वर्षभरात मध्यवर्ती मार्ड संघटनेने अनेकवेळा यासाठी सरकारकडे पाठपुरवठा केला होता. पण प्रत्येकवेळी आश्वासनांचे गाजर हे प्रशासनाकडून दाखवण्यात आले. प्रत्यक्षात कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. विविध प्रलंबित मागण्यासाठी मध्यवर्ती मार्ड संघटनेने ७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजेपासून संपावर जाण्याचा इशारा दिलेला आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर येथील सर्व निवासी डॉक्टर हे संपाची भूमिका घेतील. संपामुळे होणाऱ्या रुग्णसेवेवरील परिणामासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, आणि संपाच्या काळात सर्व अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात येतील, असे या परिपत्रकामध्ये लिहिण्यात आले आहे.

राज्यातील निवासी डॉक्टरांनी केलेल्या मागण्या…

१) राज्यातील निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा करावे.
२) निवासी डॉक्टरांना पुरेशा प्रमाणात होस्टेल उपलब्ध करून द्यावे.
३) निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे, यासर्व मागण्या निवासी डॉक्टरांनी केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी संप पुकारण्यात आला आहे.

हे ही वाचा:

Uddhav Thackeray Live , रत्नागिरीतून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर साधला निशाणा, कुणीही न मागता फुटेज समोर कसं आलं?

गणपत गायकवाड मुद्यावरून राऊतांचा हल्लबोल, संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss