Tuesday, April 23, 2024

Latest Posts

अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार, जरांगेंची मोठी घोषणा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानंतर काल रात्री मनोज जरांगे आंतरवली सराटी मध्ये गेले. तिथे जाऊन त्यांनी आज गोदा पट्ट्यातील मराठा बांधवांसोबत बैठक घेतली. त्यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, जो पर्यंत अध्यादेशाचा कायदा होऊन एकाला तरी त्या कायद्याअंतर्गत मराठा आरक्षणाचा फायदा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरु राहणार आहे. त्यामुळे या कायद्याअंतर्गत एकाही मराठ्याला आरक्षण (Maratha Reservation) मिळाले की आंदोलनाचे काय करायचे हे ठरवू. या आंदोलनाबाबत आपल्याला गाफील राहता येणार नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना या कायद्यचा लाभ झाला पाहिजे. नोंद मिळालेल्या सग्या सोयऱ्यांना सरकार काढलेल्या अधिसूचनेच्या आधारे एक तरी प्रमाणपत्र मिळे पर्यत हे आंदोलन सुरूच राहणार, असे मनोज जरांगे म्हणाले.

मुंबईमधील आंदोलन हे शांततेमध्ये पार पडले. त्याच पार्श्वभूमीवर सगळ्यांचे मला फोनही आले. सर्व जण शांततेत आले गेले त्यांचे मनापासून कौतुक. यामध्ये सगेसोयरे हा शब्द फार महत्त्वाचा आहे. त्या शब्दासाठी सरकारने १५ दिवस लावले. हे अध्यादेशाचे परिपत्रक आहे. त्यामुळे याबाबत गाफिल राहून चालणार नाही. त्यानंतर मनोज जरांगे ३० तारखेला रायगडावर जाणार आहेत. तिथे जाऊन ३० ला शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेणार त्यानंतर ३१ तारखेला घरी जाणार आहेत. खरा गुलाल हा कायद्याची अंमलबजावणी झाल्यावर एकाला तरी त्या कायद्याअंतर्गत प्रमाणपत्र मिळाल्यावर उधळू. त्यावेळी विजयी कार्यक्रम करु. कारण सगेसोयऱ्यांची अधिसूचना निघणे खूप महत्वाचे होते, असे राजपत्र क्वचितच निघतात. याच कायद्यात रूपांतर होणार आहे. ते होईपर्यंत आपण सावध राहायचे असते, असे मनोज जरांगे म्हणाले.

आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या मागण्यांमध्ये सगेसोयऱ्यांचा मुद्दा फार महत्वाचा आहे. या मुद्द्यावरून मनोज जरांगे म्हणाले, सगेसोयऱ्यांचा कायदा झाला आणि त्याचा फायदा कुणालाच झाला नाही तर? त्यामुळे सावध राहावे लागेल, हे आंदोलन गाफील ठेवून चालणार नाही. कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार आहे, असे जरांगे म्हणाले.त्यातच आता त्यांनी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरूच राहणार अशी घोषणा केली आहे.

हे ही वाचा:

Shivsena Uddhav Thackeray Group: देश हुकूमशाहीच्या वळणावर असताना…

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यापालांकडे सुपूर्द केला राजीनामा, नव्या सरकारचा शपथविधी आजच होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss