Saturday, July 27, 2024

Latest Posts

मोदी सरकारच्या काळातील हा शेवटचा अर्थसंकल्प – उद्धव ठाकरे

आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रायगड जिह्ल्याच्या दौऱ्यावर आहेत.

आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रायगड जिह्ल्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज आणि उद्या रायगडचा दौरा करणार आहेत. त्यानंतर ते ४ आणि ५ तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या रायगड मतदार संघाला त्यांनी दुपारी भेट दिली. पेण मध्ये त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी सरकारच्या काळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. मी बोललो होतो सगळे जादूचे प्रयोग सुरु आहेत. अर्थ संकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली आहे.

अजून निवडणूका जाहीर झालेल्या नाहीत. मी मागच्या आठवड्यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघ फिरलो. आता म्हंटल तुम्हाला भेटूया. सर्व विधानसभा मतदार संघात मी जाणार आहे. यांची सुरुवात मी पेण पासून करत आहे. शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केला आहे. मी काय बोललो शेवटचा. निर्मला सीतारामन यांनी जड अंत करनाने हा अर्थसंकल्प मांडला आहे, असे म्हणत सरकारवर टीका केली आहे. गरीब, महिला, तरुण, शेतकरी या जातीसाठी काम करणार असे त्या म्हणाल्या हे धाडस त्यांनी केले त्यांचे अभिनंदन. तुमच्या मित्रापलीकडे देश आहे हे आता १० वर्षानंतर त्यांना कळले. महिलांबद्दल तुम्ही बोलताय मग सीतारामन जी तुम्ही मणिपूरकडे का जात नाहीत? बिलकीस बानू कडे जा? सांगा आम्ही तुमच्या सोबत आहोत सांगा, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.

तुम्ही शेतकऱ्यांना आतेरेकी समजत आहात आता त्यांच्या बदल बोलताय. हे सगळे जादूचे प्रयोग सुरु आहे. अर्थ संकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे. आता महिलांना फुकट सिलेंडर देतील. तरुणांना नोकऱ्या देणार असे म्हटले मग १० वर्ष काय केले? आता खड्डा खाणायचा आहे, मग मतांची माती टाकायची आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन या १० वर्षातील सरकारचा कामाचा आढावा घ्या, अर्थसंकल्पामध्ये जे मांडला गेलं त्यात किती मिळाले?दोन वादळ महाराष्ट्रात आली तेव्हा आपल्या सरकाराने निकषाबाहेर जाऊन मदत केली. तेव्हा पंतप्रधान फिरकले सुद्धा नाही. आतां पंतप्रधान महाराष्ट्र वाऱ्या करताय, आता मत पाहिजे असताना मेरे प्यारे देशवासीयो सुरु आहे. विकास म्हणजे तुम्हाला चिरडणे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Latest Posts

Don't Miss