Wednesday, April 24, 2024

Latest Posts

Gautami Patil च्या कार्यक्रमात पत्र्याचं शेड कोसळलं, अन्…

लग्नाचा कार्यक्रम असो, वाढदिवसाचा कार्यक्रम असो की गावचा तमाशा, खासगी बैठका असो की अन्य कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असो नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची चलती आता सगळ्याच ठिकाणी बघायला मिळत आहे.

लग्नाचा कार्यक्रम असो, वाढदिवसाचा कार्यक्रम असो की गावचा तमाशा, खासगी बैठका असो की अन्य कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असो नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची चलती आता सगळ्याच ठिकाणी बघायला मिळत आहे.आता गौतमी इतकी famous झाली आहे की , तिचे नृत्य ठेवल्याशिवाय गावचा एकही कार्यक्रम होत नाही. गौतमी आणि गर्दी हे ठरलेलं समीकरण आहे. गौतमी जिथे जातं तिथे गर्दी होतेच होते. गौतमीच्या कार्यक्रमात बसायला जागा नसते म्हणून कुणी झाडावर जाऊन बसतो तर कुणी घराच्या छतावर जाऊन बसतात. आणि गौतमीच्या अश्याच एका कार्यक्रमात एक मोदी दुर्घटना हि झाली आहे.

सोशल मीडियामुळे अत्यंत प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अपघात झाला आहे. छत्रपती संभाजी नगर येथील वैजापूरमधल्या महालगाव या ठिकाणी गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम हा आयोजित होता. महालगाव येथे गौतमी पाटील हिचा बस स्थानकाजवळ कार्यक्रम सुरू होता. ज्या ठिकाणी कार्यक्रम हा आयोजित केला जातो त्या संदर्भातली माहिती हि सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असते. आणि त्यामुळेच आणखी जास्त गर्दी ही होत असते. गौतमीचा कार्यक्रम हा सुरु झाला. पण या कार्यक्रमात एक अनपेक्षित घटना ही घडली आहे. आणि या झालेल्या घटनेमुळे आता गौतमी ही पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे. नेहमी प्रमाणे या कार्यक्रमात देखील गौतमीचा नाच पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात ही गर्दी झाली होती. तिचा डान्स पाहण्यासाठी काही चाहते एका पत्र्याच्या दुकानाच्या शेडवर बसले होते. नाच सुरु झाला. राती अर्ध्या राती हे गाणं सुरु होतं. तेवढ्यात पत्र्याची शेड कोसळली. या संदर्भातला व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या घटनेत काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र नेमके किती लोक जखमी झाले ते समजू शकलेलं नाही.

 गौतमी ही अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आली. गल्लीबोळात तिच्या नावाच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. मात्र प्रसिद्धीचे फायदे आणि तोटेही सहन करावे लागत आहेत. तिच्या कार्यक्रमात भांडणं, अपघात असे प्रकार सर्रास घडतात. आजदेखील वैजापूरमध्ये शेड कोसळल्याने लोक जखमी झाले आहेत. सबसे कातील गौतमी पाटील या नावाने गौतमी सोशल मीडियावर फेमस आहे. एवढंच काय तर तिच्या डान्सचा कार्यक्रम असला की तिथे गर्दी होतेच. मात्र अशा काही घटना घडतात ज्यामुळे गौतमी पाटीलची चर्चा होते.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss