Saturday, July 27, 2024

Latest Posts

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Hiwali Adhiveshan 2023) आज शेवटचा दिवस आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Hiwali Adhiveshan 2023) आज शेवटचा दिवस आहे. तसेच आज दोन्ही सभागृहात विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) किंवा उपमुख्यमंत्री उत्तर देणार आहेत. सत्ताधारी पक्षाच्या विदर्भाचा (Vidarbha) विकास या संदर्भातील प्रस्तावावर मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विदर्भासाठी काही विशेष पॅकेज किंवा सवलतीची घोषणा होतात का हे पाहावे लागेल. अधिवेशन संपल्यानंतर संध्याकाळी विरोधी पक्षांची पत्रकार परिषद होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडेल.

अधिवेशनाचा कालावधी २ दिवसांनी वाढवण्यात यावा, अशी विरोधकांनी मागणी केली होती. मात्र, या मागणीचा विरोध करत सरकारने आधी ठरल्याप्रमाणे आजच (२० डिसेंबर, २०२३) अधिवेशन संपवण्याची मागणी केली आहे.विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्च असे चार दिवस हे अधिवेशन असणार आहे.या अधिवेशनात अर्थसंकल्पासह मराठा आरक्षणाचाही निर्णय होण्याची शक्यता आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार (Special Assembly Session For Maratha Reservation) असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे. ज्या त्रुटी आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवणारा आरक्षण देणार आहे. मागासवर्ग आयोगाच अहवाल एक महिन्यांत देण्यात येणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन बोलावून आम्ही आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे. ज्या त्रुटी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यास सरकार कटिबद्द असल्याची ग्वाही एकनाथ शिंदेंनी दिली आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल एका महिन्यात येईल. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलावून आम्ही आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तर नोंदी सापडलेल्यांच्या कुटुंबीयांनाही कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

MAHARASHTRA: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची मुंबईत एन्ट्री, JN. 1 किती धोकादायक आहे ?

Christmas 2023: घरच्या घरी करा ख्रिसमसचे Celebration

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss