Tuesday, April 30, 2024

Latest Posts

कुठे उष्णतेचा ऑरेंज अलर्ट तर कुठे पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज काय?

राज्यात काही जिल्ह्यांना पुढील २४ तासात पाऊसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आलेला आहे. तर इतर काही भागात तापमानामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या वातावरणात अनेक बदल चालू आहेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी प्रचंड ऊन. कुठे अवकाळी पावसाचा अलर्ट तर कुठे उष्णतेच्या लाटेचा अलर्ट. हवामान खाते (Regional Meteorological Department) वेळोवेळी नागरिकांना माहिती देत असते. राज्यात काही जिल्ह्यांना पुढील २४ तासात पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आलेला आहे. तर इतर काही भागात तपमानामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. आज कोकणात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) अंदाज वर्तवला असून, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता ही हवामान विभागाने सांगितली आहे. याबाबत हवामान विभागाने आपल्या सोशल मिडिया हॅन्डल वरून माहिती पोस्ट केली आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा परिसरात पावसाचा अलर्ट जारी केला असून हलक्या पावसासह वि‍जेचा गडगडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता देखील आहे. तसेच मुंबई शहर व उपनगरांमध्ये आकाश स्वच्छ राहील पण उष्णतेच्या लाटेची शक्यता राहील. मुंबई शहर व उपनगरांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सियस राहील (40 Degree) नागरिकांना प्रचंड उन्हाचा सामना करावा लागेल.

उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तर बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. वादळवारा आणि गारपीटमुळे शेतकर्‍यांचं भारी नुकसान झाले आहे. भंडार्‍यात झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे घराची पत्रे उडाली. अनेक झाडे कोलमडून पडली. अवकाळी पावसामुळे बीड जिल्ह्यातील आष्टी मधील भाळवणी गावातील अनेक फळबागा या अवकाळी पावसाने उध्वस्त केल्या असून घरांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. वाशीम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने नागरिक हैराण झाले आहेत. अवकाळी पाऊस तर कधी उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत.

हे ही वाचा:

Ajit Pawar सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, Rohit Pawar यांची टीका

मतांसाठी श्रीरामाचा गैरवापर, Nitin Gadkari यांची उमेदवारी रद्द करा, Congress चे Atul Londhe यांची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss