जान्हवी कपूरने केले ६८ व्या फिल्मफेअर पुरस्कारचे छायाचित्र सोशल मीडियावर शेयर

जान्हवी कपूरने केले ६८ व्या फिल्मफेअर पुरस्कारचे छायाचित्र सोशल मीडियावर शेयर

जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) बॉलीवूडमध्ये एक उगवती स्टार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे आणि ती तिच्या प्रत्येक कामगिरीने यशाची शिडी चढत आहे. नुकताच तिने तिच्या सोशल मीडियावर फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे फोटो शेयर केले आहेत. ती फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये परफॉर्म करण्यासाठी सज्ज आहे. तिने तिचे २ लुक सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री जान्हवी कपूर फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी तयार आहे. अभिनेत्री जान्हवीने तिच्या इंस्टा कुटुंबाला खूप आश्चर्यकारक करणारे फोटो तिने शेयर केले आहेत.
जान्हवीचा क्लासि लुक पाहून तिचे चाहते तिच्यापासून नजर हटवू शकत नाही आणि तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये दोन लुक केले आहेत.
जान्हवी कपूरला तिच्या मिली मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. ती त्याच श्रेणीत आलिया भट्ट ( गंगूबाई काठियावाडी) , करीना कपूर खान (लाल सिंग चड्ढा) , भूमी पेडणेकर (बधाई दो) आणि तब्बू (भूल भुलैया 2) यांच्याशी स्पर्धा करणार आहे.
जान्हवी तिच्या पहिल्या लुकमध्ये हिरव्या रंगाचा गाऊन घातला आहे आणि त्यामध्ये तिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. जान्हवीने पोस्ट शेयर करताना तिने कॅप्शनमध्ये फक्त “Hiiiii” असे लिहिले.
जान्हवीने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच , तिच्या BFF ओरहान अवत्रामणीने त्वरित उत्तर दिले: “हाय जान्हवी कपूर.” अभिनेत्री हिरव्या रंगाच्या कट-आउट ड्रेसमध्ये जबरदस्त दिसत आहे.
दिवा फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२३ मध्ये परफॉर्म करण्यासाठी सज्ज आहे. तिने आता इव्हेंटमधील जबरदस्त छायाचित्रे पोस्ट केली आहेत. जान्हवीने आकर्षक जांभळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर गाउन परिधान केला आणि एका सुंदर नेकलेसने तिचा लूक पूर्ण केला.

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version