Friday, May 17, 2024

Latest Posts

बजेटवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

आजचा दिवस हा भारतासाठी अत्यंत महत्वाचा होता. आज भारताचा संकल्प हा मांडण्यात आला. त्यानंतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देत आहे. तर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणुकीआधीचा शेवटचा पूर्णवेळ अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत सादर केला. यामध्ये मध्यमवर्गाला दिलासा मिळण्यासाठी करसवलतीची मर्यादा ५ लाखांवरून ७ लाख करण्यात आली आहे. याशिवाय काही गोष्टी महाग झाल्यात, तर काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. विरोधकांकडून टीका केली जात आहे. शिवसेनेकडूनही या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय मिळाले, अशी विचारणा ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.

ज्या राज्यातून वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn), टाटा एअरबस (Tata Airbus), गीफ्ट सिटी (Gift City), फायनान्शिअल सेंटर तिथे गेले आहे. इतकेच नव्हे तर अधिकच्या सवलतीही देण्यात आलेल्या आहेत. सूरतला डायमंड हब (Diamond Hub) मिळाले आहे. पण ज्या महाराष्ट्रातून जिथे जिथे, ज्या राज्यात उद्योग नेले, त्याच महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, “भाजप (BJP) सरकारने गुजरात मध्ये १५० पेक्षा जास्त जागा आणण्यासाठी महाराष्ट्रातील अन्क उद्योगधंदे (Industries), प्रकल्प गुजरातला (Gujarat) नेले आहेत. अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारने माहराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जखमेवर नेहमीच मीठ चोळले आहे. एक्झिट पोलनुसार कर्नाटकामध्ये भाजप पिछाडीवर दिसत असल्याने निवडणुका डोळ्यासोमोर ठेऊनच विशेष तरतूद केली गेली आहे. कर्नाटकात (Karnataka)गेली अनेक वर्षे त्यांचेच सरकार असूनही कर्नाटकसाठी एव्हढी तरतूद करण्याची गरज का पडली ? अर्थसंकल्पात दुसर्या कुठल्याही राज्याचा उल्लेख नाही पण कर्नाटकला विशेष सवलत दिली गेली आहे. महाराष्ट्रात ओढताण करून घटनाबाह्य सरकार बनवूनही मोदी सरकारने महाराष्ट्राला काहिच दिले नाही.” असे मत आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

Budget 2023 विमा कंपन्यांना बजेटचा झटका, कंपन्यांचे शेअर घसरले १४ टक्क्यांनी

Budget 2023, दिगदर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अर्थसंकल्पावर ट्विट करत दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss