Friday, April 26, 2024

Latest Posts

Budget 2023 विमा कंपन्यांना बजेटचा झटका, कंपन्यांचे शेअर घसरले १४ टक्क्यांनी

नवीन कर प्रणाली अंतर्गत ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही, अशी घोषणा करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitaraman) यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला आहे. नोकरी व्यवसायापासून ते गरीब-शेतकरी आणि महिलांपर्यंतच्या लोकांसाठी अर्थमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या. मध्यमवर्गीय आणि नोकरदारांना कराच्या वाढीवर दिलासा मिळाला आहे. नवीन कर प्रणाली अंतर्गत ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही, अशी घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्ग खूश असेल, पण विमा कंपन्यांचे बजेट काहीसे कोलमडले आहे. विमा पॉलिसी प्रीमियमवरील कर सूट आणि नवीन कर प्रणाली आकर्षक बनविण्याच्या प्रयत्नात अर्थसंकल्पीय घोषणांनंतर एलआयसी (LIC Share Price ) सह सर्व मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत.

विमा क्षेत्रावर लक्ष ठेवणाऱ्या विश्लेषकांचे म्हणणे आहे की, नवीन कर प्रणालीला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे विमा कंपन्यांच्या व्यवसायाला मोठे नुकसान होईल. अनेक करदाते केवळ कलम ८०क अंतर्गत सूट मिळवण्यासाठी विमा पॉलिसी खरेदी करतात. जर नवीन कर प्रणाली अधिक फायदेशीर असेल, अधिक करदाते ते निवडतील, तर विमा पॉलिसींच्या विक्रीवर परिणाम होईल.

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात उच्च-मूल्याच्या विमा पॉलिसींमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरील प्राप्तिकर सूट मर्यादित केली आहे. अर्थसंकल्पात असे म्हटले आहे की १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जारी केलेल्या जीवन विमा पॉलिसी (ULIPs वगळता) ज्यांचा एकूण प्रीमियम ५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा पॉलिसींमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरच सूट दिली जाईल. ५ लाखांपेक्षा कमी प्रीमियम असलेल्या पॉलिसींवर सवलत मिळणार नाही. याचा अर्थ विमाधारकाच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या रकमेवरील कर सवलतीवर परिणाम होणार नाही, असे बजेटमध्ये सांगण्यात आले होते. यासोबतच ३१ मार्च २०२३ पूर्वी जारी केलेल्या विमा पॉलिसींवर कोणताही परिणाम होणार नाही, म्हणजेच त्यांना कर सवलतीचा लाभ मिळत राहील.

बजेट सादर झाल्यानंतरच विमा कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. एलआयसीच्या (LIC) शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि NSE वर दुपारी ३.३० वाजता ८ टक्क्यांनी घसरून ६०१ रुपयांवर व्यवहार आला. त्याच वेळी, एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे शेअर्स १० टक्क्यांनी घसरून १,०९७.९५ रुपयांवर, ICICI प्रुडेन्शियल लाइफचे शेअर्स ९.८८ टक्क्यांनी घसरून ४०७.५० रुपयांवर आणि HDFS लाइफ इन्शुरन्सचे शेअर्स ११ टक्क्यांनी घसरून ५१५ रुपयांवर आले. जनरल इन्शुरन्सचे शेअर्स इंट्राडेमध्ये १४ टक्क्यांनी घसरून १५८ रुपयांवर आले आहेत.

हे ही वाचा:

Budget 2023, दिगदर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अर्थसंकल्पावर ट्विट करत दिली प्रतिक्रिया

Budget 2023 काय आहे क्रिप्टोकरन्सीचे गणित?, कसे असेल क्रिप्टोचे भविष्य?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss