Monday, May 6, 2024

Latest Posts

Budget 2023, दिगदर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अर्थसंकल्पावर ट्विट करत दिली प्रतिक्रिया

आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला आहे. बॉलीवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी आज सादर करण्यात आलेल्या बजेट संदर्भात त्यांच्या सोशलमिडीयावर प्रतिक्रिया दिली आहे. बॉलीवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे कायम चर्चेत असतात. विवेक अग्निहोत्री हे कायं सोशलमिडीयावर सक्रिय असतात. नुकताच सादर करण्यात आलेल्या देशाच्या अर्थसंकल्पावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये विवेक अग्निहोत्री यांनी सरकारचे कौतुक केले आहे.

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थासंकल्प सादर केले आहे. हा अर्थसंकल्पात केंद्र सरकारने करदात्यांसाठी करपात्र रकमेत सूट देण्याबरोबरच अनेक घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये ७ लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. तसेच टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहेत. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे कायमी त्यांच्या वक्तव्यांमुळे मुळे चर्चेत असतात. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे अनेक वेळा राजकारणावर देखील वक्तव्य करतात. तर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटमध्ये टॅक्स वरील घोषणे संदर्भात म्हटले आहे की , “स्लॅब ५ लाखावरून ७ लाख करण्याचा निर्णय शानदार आहे, वाह” तसेच अग्निहोत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची स्तुती करत लिहिले आहे की ‘हा अर्थसंकल्प अत्यंत चांगला आहे. नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन. मोर पावर टू भारत’ असे लिहीत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Vivek Agnihotri) यांची स्तुती केली आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे चाहते हे त्यांचा ‘द व्हॅक्सीन वॉर (The Vaccine War) या आगामी चित्रपताची वाट पाहत आहेत. हा विषय कोरोना काळातील लसीकरणा संदर्भात आहे. म्हणूनच या चित्रपटाला एक वागला महत्व मिळू शकत. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२३ रोजी दर्शकांच्या भेटीला सज्ज झाला असून, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली यासह १० हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा:

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ‘चुनावी जुमला’ असलेला अर्थसंकल्प, अजित पवारांची टीका

Union Budget 2023 अर्थसंकल्पीय भाषणानंतर अर्थमंत्री घेणार पत्रकार परिषद, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss