Saturday, May 4, 2024

Latest Posts

Amravati मध्ये Bachchu Kadu यांच्या सभेची परवानगी नाकारून Amit Shah यांची होणार सभा, प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर देशभरात रणधुमाळी सुरु आहे. वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या पक्षांच्या प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या प्रचारसभांना लाखोंची गर्दी पहायला मिळत आहे. अश्यातच, एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. अमरावती (Amravati) येथे होणार असलेल्या प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या सभेला परवानगी नाकारल्याने ते आक्रमक झाले आहेत.

अमरावती येथील सायन्सकोर मैदान येथे बच्चू कडू यांना सभेसाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आत त्याच सभास्थळावर अमित शहा (Amit Shah) यांची सभा होणार आहे. अमित शहा यांच्या सुरक्षेसाठी बच्चू कडू यांच्या सभेची परवानगी काढून घेण्यात आली. बच्चू कडू सभेसाठी मैदान ताब्यात घेण्याकरिता मैदानात दाखल झाले. परंतु, त्या वेळी मैदानात भाजपच्या (BJP) उमेदवार नवनीत राणा (Naavneet Rana) यांचा मंडप टाकला होता. मैदानाची परवानगी असतानादेखील बाच्चू कडूंना मैदानाच्या बाहेर काढ़ण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यावरून बच्चू कडू प्रचंड आक्रमक होत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची केली.

एकीकडे बच्चू कडू आक्रमक झाले असतानाच दुसरीकडे अमित शहा यांच्या सभेचा मंडप वाऱ्याने कोसळला. याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले, “हनुमानजींनी काम दाखवलं. एक लाथ मारली आणि मंडप पाडला. त्यांची चालीसा पण चुकीची होती, राजकीय होती. तुमची हि जबरदस्ती सुरु आहे, त्यावर हनुमानजींही बोलत आहेत, हे चालणार नाही. देव आमच्यासोबत आहे. इथे काही कायदा राहिलेला नसून पोलीस अधिकारी भाजपसारखे बोलत आहेत.”

यावेळी त्यांनी आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “अमित शहा अमरावतीत येत आहेत. त्यांनाही माहीत आहे कि रवी राणा भाजपला बदनाम करत आहे. भाजपसारखा शिस्तबद्ध पक्ष रवी राणा यांच्या ताब्यात गेल्यामुळे सांस्कार, कायदा मोडून हे सर्व चालू आहे. आम्ही पैसे भरले, परवानगी घेतली. २३-२४ तारखेसाठी मैदान आमच्या ताब्यात आहे. १८ तारखेला आम्ही पैसे भरले आणि आता आमच्याच घरातून हाकलण्यासाठी आता पोलीस प्रशासन काम करत आहे.”

हे ही वाचा:

BJP ने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या Eknath Shinde यांनी Congress वर बोलू नये, Nana Patole यांचा घणाघात

PM Modi यांना Congress नेत्याचे खडेबोल, मुस्लिमांवरील वादग्रस्त विधानामुळे Election Commission कडे करणार तक्रार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss