Friday, April 26, 2024

Latest Posts

सर्वात मोठी बातमी !, सत्तासंघर्षांचा निकाल काही तासांवर असताना Narhari Zirwal ‘नॉट रिचेबल’

अखेर आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल हा लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार की शिंदे सरकार कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे.

अखेर आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल हा लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार की शिंदे सरकार कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल एकमताने येण्याची शक्यता असून सरन्यायाधीश चंद्रचूड हा निकाल वाचून दाखवणार आहेत. सत्तासंघर्षांचा निकाल अवघ्या काही तासांवर असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) नॉट रिचेबल असल्याची चर्चा रंगत आहे.

काही महिन्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून काढता पाय घेतला. आणि शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी गुवाहाटी गाठलं. त्यावेळी विधानपरिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्यांना अपात्रतेची नोटिस बजावली. ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा दिला आणि त्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलावले. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या संदर्भात अखेर आज निकाल लागणार आहे. आजचा हा महत्वाचा दिवस आहे.

नरहरी झिरवळ यांचे दोन्ही फोन सकाळपासूनच बंद आहेत. ते आपल्या गावीही नाहीत. त्यामुळेही खळबळ उडाली आहे. सत्ता संघर्षावर दुपारी 12च्या आत निकाल येणार आहे. असं असताना झिरवळ नॉट रिचेबल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. निकालाच्या दोन दिवस आधी झिरवळ यांनी एक मोठं विधान केलं होतं.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. नरहरी झिरवाळ यांच्यांशी सध्या कुणाचाही संपर्क होत नसून ते नॉट रिचेबल आहेत, असा मेसेज माध्यमांमध्ये फिरू लागला. या नंतर राजकीय चर्चांना उधाण आले. त्यानंतर नरहरी झिरवाळ आपल्या गावीच असल्याची माहिती झिरवाळ यांच्या कार्यालयाने एबीपी माझाला दिली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) हे नॉट रीचेबल आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र!’ अशा आशयाचे ट्वीट राऊतांनी केलं आहे.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss