Monday, May 20, 2024

Latest Posts

भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेना पाठिंबा दर्शवणार

राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

मुंबई : राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. मातोश्रीवरील काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खासदारांची मत समजून घेत उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सूचकपणे सांगितलं आहे. तसेच याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल असेही त्यांनी म्हटलं आहे.

या निर्णयाला खरे तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोध केला होता. मात्र त्यांचा विरोध डावलून उद्धव ठाकरे यांनी बहुतांश खासदारांच्या मागणीला मान देणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्वात आधी खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती करणारं पत्र लिहिलं होते.

त्यानंतर हीच मागणी आणखी 11 खासदार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी शिवसेनेतील खासदारांनी केल्यानं आधीच आमदारांच्या बंडामुळे पक्षाला पडलेली खिंडार भरुन काढताना खासदारांच्या मागणीचा विचार उद्धव ठाकरे करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता.

हेही वाचा : 

ओबीसी राजकीय आरक्षणचे काय होणार ? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष

एकनाथ शिंदे यांच्या गटाला एनडीएने राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भातील बैठकीसाठी निमंत्रण मिळाले आहे. दीपक केसरकर दिल्लीला जाणार असल्याचे सांगितलं असता आम्ही या सर्व गोष्टींकडे तटस्थपणे पाहतो, असं संजय राऊत म्हणाले.

Mumbai Monsoon Update : मुंबईत १४ जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी

Latest Posts

Don't Miss