Saturday, May 4, 2024

Latest Posts

काँग्रेस नेत्याचा मोदीजींना सवाल, मुस्लिमांचेही स्वातंत्र्यात योगदान

सध्या देशभरात निवडणुकीची धूम चालू आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या पप्रचारात गुंतलेला आहे. अश्यात पंतप्रधान मोदींनीदेखील प्रचारसभांवर तडक लावला आहे. एका मागे एक असे प्रचारसभा पंतप्रधान घेत आहेत. पंतप्रधानांनी महाराष्ट्रात आजपर्यंत नांदेड परभणी वर्धा येथे सभा घेतल्या आहेत. राजस्थानमधील बांसवाडा येथे नुकतीच पंतप्रधानांची सभा झाली. पण नुकतेच या सभेत केलेल्या एका विधानामुळे पंतप्रधान वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

सध्या देशभरात निवडणुकीची धामधूम चालू आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रचारात गुंतलेला आहे. अशात  पंतप्रधान मोदींनीदेखील प्रचार सभांवर तडक लावला आहे. एका मागे एक असे प्रचारसभा पंतप्रधान घेत आहेत. पंतप्रधानांनी महाराष्ट्रात आजपर्यंत नांदेड परभणी वर्धा येथे सभा घेतल्या आहेत. राजस्थानमधील बांसवाडा येथे नुकतीच पंतप्रधानांची सभा झाली. पण नुकतेच या सभेत केलेल्या एका विधानामुळे पंतप्रधान वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पंतप्रधानांनी केलेल्या या वक्तव्यावर निवडणूक आयोग काय भूमिका घेताय हे पाहून गरजेचं आहे.

नुकतेच बांसवाडा येथे झालेल्या सभेत मोदी म्हणाले, ‘काँग्रेसचा जाहीरनामा हा माओ वादाला चालना देण्याचा प्रयत्न आहे. येथे आलेल्या एका मित्राने सांगितले कि काँग्रेसचा जाहीरनामा पहा कॉंग्रेसचा जर सरकार आलं तर तुमच्या मालमत्तेचं ऑडिट होईल. देशाच्या संपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे हे काँग्रेसनं आधीच सांगितलं आहे. तुमच्या आया-बहिणींच्या सोन्याचे आणि दागिन्यांचे मूल्य देखील मोजले जाईल. त्याच वाटप हे लोक करतील. तुमच्या संपत्तीवर यांचा काय अधिकार आहे? हे लोक तुमच्या आया बहिणींच्या अंगावर मंगळसूत्र देखील राहू देणार नाही. भ्रष्टाचार हाच काँग्रेसचा शिष्टाचार आहे’.

मोदींनी केलेल्या या वक्तव्यावर नागपूर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नैश नुसरत अली यांनी टिप्पणी केली आहे. त्यांनी म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःला ६ भावंडं आहेत. तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही सहा-सात भावंडं आहेत. त्यामुळे जास्त मूळ असल्या संदर्भात मुस्लिमांवर टीका करू नका. देशाला स्वतंत्र मिळाले, त्यात हिंदू एवढे मुस्लिमांचेदेखील योगदान होते. आणि मुस्लिम तर मृत्यूनंतर दफनही याच जमिनीत होतात हे विसरू नका.’ देशाच्या स्वातंत्र्यात मुस्लिमांचं योगदान असूनही पंतप्रधान मुस्लिमांना घुसखोर म्हणत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. निवडणूक आयोग या संदर्भात कारवाई का करत नाही, याचे मला आश्चर्य वाटते. आता लवकरच काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाकडे तक्रार करतील. काँग्रेस पक्षाने जर तक्रार नाही केली तर मी वैयक्तिक त्याकडे तक्रार करेल, असेही त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

स्वतःच्या आवाजातील हनुमान चालीसा, एक वेगळाच अनुभव – DR. SHRIKANT SHINDE

Kurla च्या वाहतूक नियंत्रण कक्षात मतदान जनजागृतीचा उपक्रम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss