Saturday, May 4, 2024

Latest Posts

स्वतःच्या आवाजातील हनुमान चालीसा, एक वेगळाच अनुभव – DR. SHRIKANT SHINDE

सध्या देशभरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त जल्लोष साजरा करण्यात येत आहे. राम नवमीनंतर आलेल्या हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी हनुमान भक्तांकडून सर्वत्र जन्मोत्सवाची थाटामाटात तयारी करण्यात आली आहे. अनेक नेते मंडळींकडून श्री हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. अशातच, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार  डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत त्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आलेल्या हनुमान चालीसाबद्दल माहिती दिली आहे.

काय आहे डॉ. श्रीकांत शिंदे यांची पोस्ट? 

आज श्री हनुमान जन्मोत्सव. श्री हनुमान हे शक्ती, प्रेरणा, सात्विकता आणि भक्तिचं प्रतिक. हीच शक्ती, भक्ती आणि प्रेरणा देणारी हनुमान चालीसा आपण आवर्जून म्हणतो, ऐकतो. आज माझ्या आवाजात ध्वनिमुद्रित झालेली हनुमान चालीसा प्रसारित होत आहे. माझ्यासाठी हा एक वेगळाच अनुभव देणारा क्षण आहे. घरात देव्हाऱ्यात देवासमोर, मंदिरात सर्वांसमोर म्हटलेली हनुमान चालीसा आज या माध्यमातून प्रसारित होणे, हे मी भाग्य समजतो. आज श्री हनुमान जन्मोत्सवच्या शुभ प्रसंगी माझ्या आवाजातील श्री हनुमान चालीसा श्री हनुमानाच्या चरणी अर्पण करतो. माझा हा प्रयत्न आपण स्वीकारावा, श्री हनुमानाची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहो. धन्यवाद !

सियावर रामचंद्र की जय, पवनसूत हनुमान की जय…

दहा वर्ष प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची

२१ एप्रिल रोजी कल्याण मतदार लोकसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या कार्य अहवालाच्या प्रकाशनाचा सोहळा पार पडला. डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. या सर्व कामांचा सविस्तर लेखाजोखा असलेल्या ‘विकासदशक- दहा वर्ष प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची’ या कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित नागरिकांसमोर गेल्या दहा वर्षात लोकसभेत केलेल्या कामांचे मुख्यमंत्री आणि जनतेसमोर सादरीकरण करत कामांची सखोल माहिती दिली. देशात रेल्वेचे सर्वाधिक काम २०१४ ते २०२४ या १० वर्षात झाले असून कल्याण लोकसभेतही मोठ्या प्रमाणात कामे झाल्याचे यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. तसेच, पाचवी सहावी लाईन, कल्याण स्टेशन रिमॉडेलिंग, सरकते जिने, होम प्लॅटफॉर्म अशा अनेक सुविधा देण्यासह रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी पक्क्या रस्त्यांचे जाळे तयार केल्याचे यावेळी डॉ. शिंदे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

सत्ताधाऱ्यांकडून आचारसंहितेचा भंग तरीही Election Commission गप्प, Congress प्रवक्ते Sachin Sawant यांचा सवाल

Kurla च्या वाहतूक नियंत्रण कक्षात मतदान जनजागृतीचा उपक्रम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss