Friday, May 17, 2024

Latest Posts

Milind Deora यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सध्या सगळीकडे आगामी लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) वारे हे वाहत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. सर्व पक्ष ऍक्शन मोड मध्ये आल्याचे चित्र दिसून येत आहे. तर लोकसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने राहिलेले असताना काँग्रेसच्या गटातून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचा दक्षिण मुंबईचा मोठा चेहरा म्हणजे मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण मुंबईमधील काँग्रेस चा मोठा चेहरा मिलिंद देवरा यांचे नाव चर्चेत होते. मिलिंद देवरा हे शिंदे गटात जाणार, काँग्रेस पक्ष सोडणार अश्या सर्व चर्चा चालू होत्या. अखेर या सर्व चर्चा हळू हळू खऱ्या ठरू लागल्या आहेत. मुंबईत काँग्रेसला मिलिंद देवरा यांनी अखेरचा दंडवत घातला आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज एकीकडे काँग्रेस चे नेते राहुल गांधी हे त्यांची भारत जोडो न्याय यात्रा ही मणिपूर येथून सुरु करत आहेत. तर दुसरीकडे मुंबईमध्ये काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया आली आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय दुर्दैवी असल्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मिलिंद देवरा यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी काँग्रेस कार्यकर्ता म्हणून हा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया नोंदवली. काँग्रेस परिवारासोबत देवरा कुटुंबिय हे अनेक वर्षांपासून निष्ठेने जोडल्या गेलेले होते. हे पाऊल टाकू नये यासाठी आम्ही सर्वांनी शर्थीने प्रयत्न केले. पक्ष नेतृत्वाने पण तुमची मनधरणी केली. पक्ष एक इतिहास रचत असताना तुम्ही पक्ष सोडण्याचे जाहीर केले. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तसेच काँग्रेस चे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आणि ते म्हणाले आहेत की, आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे. देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषीत, पीडित जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ६ हजार ७०० किलोमीटरची यात्रा काढणा-या राहुलजी गांधी यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा आपला हा प्रयत्न आपले वडील, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते स्वर्गीय मुरली देवरा यांना ही आवडला नसेल.

मिलिंद देवरा हे काँग्रेसचे मुंबईतील बडे नेते आहेत. दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. त्यांनी २००४ आणि २००९ ची लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात देवरा हे राज्यमंत्री होते. मुंबईत विशेषत: दक्षिण मुंबईत त्यांचा होल्ड आहे. काँग्रेसमध्येही त्यांचा मोठा समर्थक वर्ग आहे. अशाचत ही निवडणूक लढण्याची मिलिंद देवरा यांची इच्छा आणि तयारी आहे. मात्र या जागेवर देवरा यांनी तिकीट मिळण्याची शक्यता सध्या कमी दिसते आहे. सध्याची स्थिती पाहता दक्षिण मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत. ‘जिंकेल त्याची जागा’ हे महाविकास आघाडीचं प्राथमिक सूत्र आहे. त्यामुळे या जागेवर ठाकरे गटाने दावा केला आहे. जर ही जागा ठाकरे गटाकडे गेली. आणि त्यामुळेच मिलिंद देवरा हे नाराज असून त्यांनी हा निर्णय घेतला अश्या डेझील चर्चा चालू आहेत.

भारत जोडो न्याय यात्रा –

आज दिनांक १४ जानेवारी २०२४ पासून ‘भारत जोडो न्याय यात्रा’ (Bharat Jodo Nyaya Yatra) ही काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सुरू करणार आहेत. दिनांक १४ जानेवारी ते दिनांक २० मार्च पर्यंत ही यात्रा चालणार आहे. हा प्रवास तब्बल दोन महिने चालणार आहे. हा प्रवास मणिपूरच्या (Manipur) थौबल जिल्ह्यातून (Thoubal District) सुरू होऊन मुंबईला (Mumbai News) येऊन पोहचणार आहे. या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये राहुल गांधी हे ६ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करणार आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा इम्फाळपासून सुरू होणार आहे. ६६ दिवस चालणारी ही भारत जोडो न्याय यात्रा देशातील १५ राज्यांमधून जाणार आहे. यादरम्यान राहुल गांधी ठिकठिकाणी थांबून स्थानिक लोकांशी संवाद साधतील आणि जाहीर सभांना संबोधित करतील.

हे ही वाचा:

‘Vd 18’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान वरुण धवणच्या पायाला दुखापत

अ‍ॅनिमलच्या यशानंतर तृपी डिमरी करणार कार्तीक आर्यनसोबत स्क्रीन शेअर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss