Wednesday, May 15, 2024

Latest Posts

पुण्यात वॉशिंग मशिन नकोच,माझंही मत तेच आहे; संजय राऊतांच्या भेटीनंतर वसंत मोरेंनी केले विधान

दोन दिवसांआधी वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केलं.

दोन दिवसांआधी वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केलं. वसंत मोरे (Vasant More) यांनी अचानक राज ठाकरे (Raj Thackeray) यांची साथ सोडल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. वसंत मोरेंच्या राजीनाम्यानंतर मनसेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. मात्र आता वसंत मोरे नेमके कोणत्या पक्षात जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीती प्रमुख्य नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. ज्येष्ठ नेते शरद पवार, संजय राऊत यांची भेट घेतली. वसंत मोरे यांनी आज संजय राऊत यांची भेट घेतली. आपल्याला पुण्यात संधी मिळे, पुण्याच्या स्थानिक नेत्यांशी मी चर्चा करेन, पुण्यामध्ये वॉशिंग मशिन नकोच, माझंही मत तेच आहे, असे संजय राऊत यांच्या भेटीनंतर वसंत मोरे म्हणाले.

आपण फक्त आता महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. पण या सगळ्या भेटीगाठी मी उघडपणे घेत आहे. बंद दरवाजे ठेवून मी कोणत्याही भेटीगाठी घेत नाही आहे. मला पुण्याची लोकसभा निवडणूक लढवायची आहे,यावर मी ठाम आहे यासाठी मी महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेत आहे. संजय राऊत, शरद पवार यांच्या भेटी मी घेतल्या ते सुद्धा सकारात्मक आहे, असे वसंत मोरे म्हणाले. पुण्याची जागा काँग्रेसकडे असली तरी त्या ठिकाणची नेत्यांशी माझा समन्वय आहे त्यांच्या मी संपर्कात आहे.आमदार रविंद्र धंगेकरांशी मी फोन केला आहे. त्यांना अजून फोन करणारदेखील आहे. ते देखील माझ्या भूमिकेला साध देतील, असा विश्वास वसंत मोरेंनी व्यक्त केला आहे. सोबतच कॉंग्रेसचे अरविंद शिंदे देखील इच्छूक आहेत. त्यामुळे त्यांच्याशीदेखील चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले. महत्वाचं म्हणजे पुणे लोकसभा लढवण्यासाठी अट्टाहास केला होता. त्यामुळे माझ्या निर्णय झाला, असे वसंत मोरे ठामपणे म्हणाले.

मी महाविकास आघाडीतील कुठल्या पक्षात जाणार यावर दोन दिवसांत निर्णय घेईल. आता मी सध्या कोणत्या पक्षात जाणार यासंदर्भात बोलणार नाही सर्वांशी चर्चा झाल्यानंतर भेटीगाठी झाल्यानंतर मी निर्णय घेईल, असे वसंत मोरे यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

७ तास थांबून विजय शिवतारेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीनंतर मुख्यमंत्री म्हणाले….

Manoj Kotak यांचा पत्ता कोणी आणि का कापला? हुकमी खासदार घरी बसला! | Manoj Kotak | Loksabha Election

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss