अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारचा मुहूर्त ठरला?

काही महिन्यापूर्वी राज्यात मोठे सत्तांतर झाले. आणि या सत्तांतरामुळे राज्यातील अनेक राजकीय गणित देखील बदलून गेली होते.

अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारचा मुहूर्त ठरला?

काही महिन्यापूर्वी राज्यात मोठे सत्तांतर झाले. आणि या सत्तांतरामुळे राज्यातील अनेक राजकीय गणित देखील बदलून गेली होते. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेमधून काढता पाय घेतला आणि शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि मग राज्यात शिंदे गट आणि भाजप यांनी मिळून सरकार स्थापन केले. दिनांक ३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील सरकारची सर्व सूत्र हाती घेतली होती.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाची सूत्र घेतल्यानंतर मंत्रिमंडळ पहिला विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) तब्बल ३९ दिवसांनी झाला होता. य विस्तारानंतर अनेक दिवस खातेवाटपही करण्यात आले नव्हते. तसेच या मंत्रिमंडळात एक देखील महिला नाही यावरून देखील अनेक चर्चाना उधाण हे आलं होत. यावरून अनेक आरोप प्रत्यारोप देखील झाले होते. तसेच दुसरा मंत्रीमंडळाचा विस्तार हा कधी होणार अश्या देखील चर्चाना तोंड फुटले होते .

पहिल्या खातेवाटपानंतर मंत्रिमंडळात तब्ब्ल २८ जागा रिक्त आहेत त्यामुळे दुसरे खाते वाटप कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष हे लागले आहे. परंतु सर्वोच्च न्यालयात याचिका सुरु होती त्यामुळे हा विस्तार रखडला होता. नुकताच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा समोर आला आहे. या निकालात शिंदे सरकारला चांगलाच दिलासा मिळाला. यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली होती. आता विस्ताराचा निर्णय झाला आहे. याबाबत अनेक हालचाली देखील सुरु झाल्या आहेत. तर शिंदे गटातील मंत्र्यांची यादीही तयार केली आहे. दुसरीकडे भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यांशी चर्चा केली. जे.पी.नड्डा गुरुवारी प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीच्या निमित्ताने राज्यात आले होते. यावेळी त्यांच्यांशी विस्ताराबाबत चर्चा झाली. यामुळे येत्या २३ किंवा २४ मे रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे अशी माहिती देखील समोर येत आहे.

तर शिंदे गटाची मंत्रिमंडळ विस्ताराची यादीही तयार झाली आहे. या यादीत आमदार बच्चू कडू, प्रताप सरनाईक, सदा सरवणकर, चिमणराव पाटील, भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव यांच्यासह आणखी काही जणांचा समावेश आहे.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version