Friday, April 19, 2024

Latest Posts

१६ आमदार अपात्र ठरल्यास उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, उल्हास बापट यांचे वक्तव्य

सत्तासंघर्षाच्या निकालासाठी अवघे काही तसाच शिल्लक राहिले आहेत आणि या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पुढच्या काही तासामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे.

सत्तासंघर्षाच्या निकालासाठी अवघे काही तसाच शिल्लक राहिले आहेत आणि या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पुढच्या काही तासामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. यादरम्यान सत्तासंघर्षाच्या निकालाच्या बाबतीत उल्हास बापट यांच्या वक्तव्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात असे वक्तव्य उल्हास बापट यांनी केले आहे. तसेच दहाव्या सुचीनुसार १६ आमदार अपात्र व्हायलाच हवेत असेही उल्हास बापट म्हणाले आहेत. जर सर्वोच्च न्यायालयाने आधीची परिस्थिती पुन्हा आणण्याचा निर्णय दिला तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. असे मत उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे.

दहाव्या सूचनेनुसार १६ आमदार अपात्र ठरले पाहिजेत. जर उर्वरित २४ आमदारही अपात्र ठरतील, असा दावाही उल्हास बापट यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, अँटी डिफेक्शन लॉ राजकीय भ्रष्टाचार कमी व्हावा, लोकांनी पक्षांतर करु नये, यासाठीच आणला गेला. यामधील पहिली तरतूद म्हणजे एक तृतीयांश लोक पक्षामधून बाहेर पडले तरी ते अपात्र होत नव्हते हि तरतूद काढून टाकण्यात आली आहे. या कायद्यामध्ये घटनादुरुस्ती करुन दोन तृतियांश जण पक्षातून एकाच वेळी बाहेर पडले आणि ते दुसऱ्या पक्षात जाऊन सामिल झाले, तर ते अपात्रतेपासून वाचतील, अशी तरतूद काढण्यात आली आहे.

या प्रकरणामध्ये बाहेर पडलेले १६ जण दोन तृतियांशही होत नाहीत, तसेच ते कोणत्याही पक्षात सामील झालेले नाही. हाच मुद्दा कपिल सिब्बल यांनी पहिल्याच सुनावणीवेळी मांडला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं १६ आमदार अपात्र असल्याचा निकाल दिला, तर उरलेले आमदार पुन्हा ठाकरेंकडे येऊ शकतात. अनेक शक्यता आहेत. हा राजकारणातील खेळी झाली. असंही उल्हास बापट म्हणाले.

हे ही वाचा : 

The kerala story चित्रपटांवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, सडलेल्या मनाच्या विचारांना….

Karnataka विधानसभा निवडणुकीसाठी आज होणार मतदान, कुणाची सत्ता येणार?

उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा, घरगुती मसाला ताक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss