राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर

राजीनाम्याच्या राजकीय नाटकानंतर आज पासून दोन दिवस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार डोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. २०२४ च्या निवडणुकीचे गणित शरद पवार नव्याने मांडणार असे संकेत या दौऱ्यातून मिळत आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर

राजीनाम्याच्या राजकीय नाटकानंतर आज पासून दोन दिवस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार डोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. २०२४ च्या निवडणुकीचे गणित शरद पवार नव्याने मांडणार असे संकेत या दौऱ्यातून मिळत आहेत. आधीपासूनच शरद पवार यांचे सोलापूर जिल्ह्यावर मनापासूनच प्रेम आहे आणि त्यांचे सोलापुरवर बारीक लक्ष असते. गेल्या काही वर्षांपासून मात्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद कमीकमी होत चालली आहे. यावेळी माढा (Madha), मोहोळ (Mohol) या दोन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते.

शरद पवारांचे कट्टर सहकारी असणारे मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, लक्ष्मण ढोबळे यांनी भाजप पक्ष निवडला आणि जिल्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता दिसू लागली. ज्या माढा लोकसभेचे नेतृत्व शरद पवार यांनी केले होते, ती जागाही भाजपच्या पक्षाने मोठ्या फरकाने जिंकली होती. या कारणामुळेच विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी ८३ वर्षाचा तरुण पुन्हा मैदानामध्ये उतरला आहे. या दौऱ्यामध्ये शरद पवार पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, बार्शीसह सोलापूर शहर आणि अक्कलकोट विधानसभेसाठी सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

पंढरपूरमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम घेताना तरुण उद्योजक अभिजित पाटील यांना झुकतं माप दिले आहे. कार्यक्रमामधून राष्ट्रवादीचे भगीरथ भालके, कल्याणराव काळे या नेत्यांच्या नावाला कात्री लावल्यानं येत्या विधानसभेसाठी अभिजित पाटील हेच पंढरपूर मंगळवेढ्याचे उमेदवार राहण्याची शक्यता आहे. सांगलीमध्ये देखील राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी शेकाप विरोधामध्ये शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांना ताकद दिली होती.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version