नितेश राणेंची खोचक टीका, Sanjay Raut म्हणजे मविआची ‘Gautami Patil’

संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहेत. नितेश राणे हे आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

नितेश राणेंची खोचक टीका, Sanjay Raut म्हणजे मविआची ‘Gautami Patil’

आज सकाळी माध्यमांशी बोलत असताना भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे. यावेळी बोलत असताना नितेश राणे म्हणाले आहेत की, संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहेत. नितेश राणे हे आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपवर टीका केली होती. त्यावर आज सकाळी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देखील दिली होती. संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नितेश राणे म्हणाले आहेत की आज गजानन कीर्तिकरांवर संजय राऊतांचं फार प्रेम ऊतूजात होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गजानन कीर्तिकर, दिवाकर रावते तास न् तास बसून राहायचे. पण भेट व्हायची नाही. आज मात्र राऊत कीर्तिकरांबाबत भरभरून बोलत आहेत. गजानन कीर्तिकरांबद्दल अजिबात चिंता करू नका. ते हाडामासाचे कार्यकर्ते आहेत. बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले आहेत. ते संजय राऊतांसारखे नाहीत, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

तसेच पुढे बोलत असताना नितेश राणे यांनी संजय राऊतांवर एक खोचक टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहेत. तिला बघायला लोकांना जसं आवडतं, तसं आपल्यालाही बघायला लोक चॅनल सुरू करतात असं राऊत यांना वाटतं. पण त्यांचा हा गैरसमज दूर केला पाहिजे असं नितेश राणे म्हणाले आहेत. तसेच पुढे ते म्हणले, गौतमी पाटीलला विनंती करेन तुझं मेकअपच सामान राऊतांना पाठवून दे, असं सांगतानाच आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून हे महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलने करू नये, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली.

तसेच नितेश राणे यांनी पुढे उद्धव ठाकरे यांच्या लंडन वारीवर देखील टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि कुटुंब एक महिना लंडनला जात आहे. उद्धव ठाकरे नेमके लंडनला चाललेत की लंडन व्हाया स्वित्झर्लंडला चाललेत. काळा पैसा ठेवायला चाललेत का? त्यांनी लवकर जावं. परत आल्यावर किती आमदार तुमच्या सोबत असतील याचा अनुभव घ्यावा. प्रत्येक आमदार सोडून जायला कारण म्हणजे संजय राऊत यांचा रोज वाजणारा भोंगा, अशी टीकाही त्यांनी केली.

हे ही वाचा:

संजय राऊतांनी केली फडणवीसांवर खोचक टीका, मला त्यांची दया येते त्यांच्यावर जी वेळ…

Shubman Gill ने झळकावली एकाच सीझनमध्ये तीन शतके, अंतिम सामन्यात चौथे शतक?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version